मैत्रीमध्ये मिळालेला एक सल्ला आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पंजाबच्या कॅडेट हरसिमरन कौरला तिच्या मैत्रिणीने असाच एक सल्ला दिला आणि तिने जेईईची तयारी सोडून एनडीए परीक्षेची तयारी सुरु केली.(Harsimran Kaur NDA) यूपीएससी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्या महिला कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होऊन इतिहार घडवला. (First woman NDA cadet)
इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, १७ महिला कॅडेट्सनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत तीन वर्ष कठोर मेहनत घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केले.(Women in NDA) एनडीएच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला.
वयाच्या सोळाव्या वर्षी स्तनात झाली गाठ, कॅन्सरशी लढली आणि.. मिस वर्ल्ड झालेल्या तरुणीची कहाणी..
या १७ एनडीए महिलांच्या तुकडीत पंजाबची हरसिमरन कौर आहे. ती म्हणते प्रवास सोपा नव्हता पण प्रेरणादायी होता. तिचा जन्म लष्करी कुटुंबात झाला. वडील सैन्य दलात हवलदार आहे तर आजी-आजोबा देखील देशप्रेमी आहेत. त्यामुळे जन्मापासूनच देशभक्ती आणि शिस्तीचे धडे मी गिरवले. त्यांच्यासाठी हा क्षण ऐतिहासिक होता.
जेईई सोडली अन् NDA मध्ये मिळाला प्रवेश
हरसिमरन कौर सुरुवातीला जेईई मेन्सची तयारी करत होती. तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की, तु जेईईची परीक्षा देऊ नकोस. आता महिला एनडीएच्या परीक्षेला बसू शकतात. २०२१ मध्ये न्यायालयाच्या निर्णायानेन महिलांसाठी हा मार्ग खुला झाला. तिने ही संधी पूर्ण धैर्याने आणि आत्मविश्वासाने स्विकारली. तिची लष्करी सेवेसाठी कोणतीही तयारी नसताना देखील तिने आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले.
सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो मुलींसाठी तिची कहाणी प्रेरणादायी आहे. जर आपली इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. आपण स्वत:वर विश्वास ठेवला, मनाचे ऐकले आणि पुढे गेलात तर ध्येयापासून आपल्याला कुणीही दूर करणार नाही. जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो.