Lokmat Sakhi >Inspirational > गाझाच्या राखेतून उमललेलं स्वप्न, मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पॅलेस्टिन तरुणी-लढाई मोठी पण..

गाझाच्या राखेतून उमललेलं स्वप्न, मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पॅलेस्टिन तरुणी-लढाई मोठी पण..

Nadine Ayoub Miss Universe 2025 : Gaza Miss Universe contestant: Palestine beauty queen: नदीन आयूब म्हणते ही स्पर्धा फक्त सौंदर्याची नाही तर पॅलेस्टाईन लोकांचा, महिलांचा आणि विशेषत: लहान मुलांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यासाठी खास व्यासपीठ आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 15:22 IST2025-08-19T15:20:47+5:302025-08-19T15:22:41+5:30

Nadine Ayoub Miss Universe 2025 : Gaza Miss Universe contestant: Palestine beauty queen: नदीन आयूब म्हणते ही स्पर्धा फक्त सौंदर्याची नाही तर पॅलेस्टाईन लोकांचा, महिलांचा आणि विशेषत: लहान मुलांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यासाठी खास व्यासपीठ आहे.

Nadine Ayoub First Palestinian woman Miss Universe 2025 Gaza representative Palestine beauty queen inspirational story | गाझाच्या राखेतून उमललेलं स्वप्न, मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पॅलेस्टिन तरुणी-लढाई मोठी पण..

गाझाच्या राखेतून उमललेलं स्वप्न, मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पॅलेस्टिन तरुणी-लढाई मोठी पण..

इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनसोबत आजही युद्ध सुरु आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. (Nadine Ayoub Miss Universe) तर दुसरीकडे नदीन आयूबने ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करुन देशातील पहिली महिला ठरली. मिस पॅलेस्टाईन असलेली नदीन आयूब आता मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. (Gaza Miss Universe contestant) मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशने CNN ला दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. (Palestine beauty queen) अमेरिकेपासून युरोप आणि इतर देशातील मुली आपलं सौंदर्य दाखवून नदीन आयूबसोबत स्पर्धा करतील. (First Palestinian woman Miss Universe)

MUO विविधता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि महिला सक्षमीकरणाला नेहमी प्राधान्य देते आणि जगभरातील अनेक प्रतिनिधींचे अभिमानाने स्वागत करते. असं त्यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईनमधील वकील आणि मॉडेल आयूब आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करेल. २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या ७४ व्या मिस युनिव्हर्स फायनलमध्ये १३० हून अधिक देश आणि प्रदेशांमधील स्पर्धक सामील होतील .

कष्टाचं फळ! व्हिलचेअरवर बसून काढले दिवस-शाळेने प्रवेशही नाकारला; मात्र तिने जिद्दीने मिळवलीच आयआयटीमध्ये संधी

एमयूओने असं म्हटलं की, आम्ही मिस युनिव्हर्रसच्या मंचावर आयूबचे स्वागत करण्यास तयार आहोत. ती जगभरातील अनेक स्पर्धाकांसोबत उभी राहिल आणि पॅलेस्टाईनचे प्रतिनिधित्व करेल. अबू धाबीच्या वृत्तसंस्था 'द नॅशनल' नुसार आयूबला २०२२ मध्ये पॅलेस्टाईनचा किताब देण्यात आला होता.

तिने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत म्हटले मला पॅलेस्टाईन लोकांचा आवाज व्हायचं आहे. मला अभिमाने सांगावसं वाटतंय, मी पहिल्यांदाच पॅलेस्टाईनचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्समध्ये करणार आहे. ती असंही म्हणाली की ही स्पर्धा फक्त सौंदर्याची नाही तर पॅलेस्टाईन लोकांचा, महिलांचा आणि विशेषत: लहान मुलांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचं व्यासपीठ आहे. तसंच पॅलेस्टाईन लोकांच्या संघर्षाच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं ते मी या मंचाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवेल.

व्हिडीओमध्ये नदीनने असंही म्हटलं की, पॅलेस्टाईन महिलांना स्वप्नं आहेत, त्यांच्यात विविध कौशल्य आहे. त्या अनेक अडथळ्यांवर मात करत स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. जगभरातील अनेकांनी या महिलांचं योगदान, अस्तित्व ओळखायला हवं आणि मी अशा महिलांसाठी आवाज बनण्याचा प्रयत्न करते. माझ्या या प्रवासातून अनेक मुलींना प्रेरणा मिळेल अशी आशा.


Web Title: Nadine Ayoub First Palestinian woman Miss Universe 2025 Gaza representative Palestine beauty queen inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.