मुंबईत लोकल ट्रेनमध्ये पुरूषांच्या डब्यात काळा स्कर्ट घालून रॅम्प वॉक करणारा तरुण सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. त्या तरुणाचा हटके लूक आणि स्टाईल सध्या चर्चेत आहे. नक्की हा मामला आहे काय? तर शिवम भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. स्कर्ट घालून ट्रेनच्या डब्यात चढलेल्या शिवमला पाहून बाकीचे प्रवासी चकीत झाले. शिवमनं आपलं इंस्टाग्राम अकाऊंट ‘द गाय इन अ स्कर्ट’ या नावानं तयार केलं आहे. (Mumbai maharashtra viral video of man on instagram walking ramp wearing black skirt)
शिवम सांगतो, ‘जेव्हा मी माझी रील एडीट कर होतो, तेव्हा लोकल ट्रेनमध्ये माझ्या रॅम्प वॉकबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मी थक्क झालो होतो. काही लोक तर बघतच राहिले. पण एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि मी कलाकार आहे का असे विचारले. यामुळे मला आनंद झाला की समाजात आपल्याला समजून घेणारे लोक आहेत. माझ्या स्कर्टवाल्या व्हिडिओवर ९० टक्के प्रतिक्रिया सकारात्मक होत्या.'
कोण आहे शिवम
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातला हा शिवम. तो LGBTQ समुदायाचा भाग आहे. तो उघडपणे आपण समलैंगिक असल्याचे सांगतो. जेंडर न्यूट्रल जगण्याचे, कपड्यांचे आणि फॅशनचे समर्थन करतो. स्कर्ट फक्त बायकाच घालतात पुरुषांनी घालू नयेत असे त्याला वाटत नाही. पोशाख जेंडर न्यूट्रल असावेत असे त्याचे मत आहे. तो म्हणतो आवडत असेल तर पुरुष देखील स्कर्ट घालू शकतात. पण भारतीय समाजात पुरुषांनी असा पोशाख करणं रुचत नाही. समाजमान्य नाही. त्यामुळे कुणी तरुण स्कर्ट घालून फिरतो याचे लोकांना फार आश्चर्य वाटते.
घामानं केस चिपचिपीत होतात, खाज येते; केस धुताना १ ट्रिक वापरा; सिल्की-शायनी राहतील केस
शुभम म्हणतो, स्त्रिया पँटसूट घालू शकतात, तर पुरुषही स्कर्ट घालू शकतात. स्कर्ट घातला म्हणून काही त्यांचं पुरुष असणं बदलणार नाही. तुम्ही कोणतेही कपडे घातले तरी शेवटी माणूसच असता. शिवमला फॅशनमध्ये करिअर करायचं होतं. त्यांच्या आई वडिलांना हे मान्य नव्हतं. मग त्यानं वयाच्या १९ व्या वर्षीच घर सोडलं. आता यानिमित्तानं तो सोशल मीडियात चर्चेत आहे.