Join us

तुला जपणार आहे! अपघातात मायलेक दोघंही भाजले, तान्ह्या बाळासाठी आईने मात्र दिली आपली त्वचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 19:31 IST

Brave mother saves baby with skin graft in plane accident : Inspirational story : आईची माया बाळाला वाचवण्यासाठी काहीही करु शकते, एका हिमतीच्या जिगरबाज आईची ही गोष्ट..

१२ जून रोजी एअर इंडियाचे विमान IC171 अहमदाबादमधील मेघनानगर येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी इमारतीवर कोसळले.(Air India plane crash) यामध्ये असणाऱ्या अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. या ठिकाणी असणाऱ्या मनीषा कछडिया आपल्या मुलासह या इमारतीमध्ये होत्या.(Air India tragedy hero story) या विमान अपघातात आगीच्या लाटेत, धुराच्या लोटात आणि मृत्यूच्या सावलीतून मनीषा आपल्या ८ महिन्यांच्या मुलासाठी ढाल बनली. आपल्या मायेच्या पदरात मुलाला सांभाळलं पण तरी दोघंही भाजले. ध्यांश नावाचं हे बाळ ३६ टक्के भाजलं होतं. आईही पोळलेलीच होती.(Manisha Kachhadiya) पण लेकरासाठी आईनं आणि तिच्या हिमतीमुळे डॉक्टरांनी जे केलं त्यामुळे दोघंही आता सुखरुप घरी पोहचले. आईच्या मायेचीच ही कहाणी.

लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन, बुद्धिबळाच्या पटावर सांगतेय आपला दावा हक्कानं

विमान अपघातात जखमी झालेला ध्यांश आता हसतो खेळतो आहे. त्याचा चेहरा, डोके आणि हात खूप जास्त भाजले होते. त्याची आई माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,  मी माझ्या मुलासह क्वार्टरमध्ये होते. क्षणभरात काहीच कळालं नाही, अचानक धुरांचे लोट आणि आग दिसू लागली. मी ध्यांशला माझ्या कुशीत घेतलं आणि बाहेर पळाले. त्यात मी आणि माझं बाळ जखमी झालो होतो. आपण जगू शकणार नाही असं ही वाटलं. पण आपल्या बाळासाठी काही तरी करायला हवं, म्हणून रस्ता दिसेल तिथे धावत सुटले."

पण तरी बाळ पोळलंच. त्या बाळाला बरं करण्यासाठी त्वचा प्रत्यारोपणाचा, प्लास्टिक सर्जरीचा उपाय होता. मुलाच्या जखमा बऱ्या करण्यासाठी आईने स्वत:ची त्वचा प्रत्यारोपण करण्यासाठी दिली. मुलाला आणि आईला आधीच जखमा झाल्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यावी लागली. बाळाचे वडील स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांनी देखील यात खूप मदत केली. इतकेच नाही तर अपघातामुळे बाळाच्या फुफ्फुसांची एक बाजू रक्ताने भरली होती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सध्या दोघेही बरे झाले आहेत. पण आईच्या प्रेमाला आणि तिच्या त्यागाला पैशातही तोलता येणार नाही. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीएअर इंडिया