३१ मे रोजी शनिवारी भारतातील हैदराबाद येथे मिस वर्ल्ड २०२५ चा ग्रँड फिनाले पार पडला.(Miss World 2025) या स्पर्धेत १०८ देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सुंदरींमध्ये थायलंडत्या ओपल सुचता चुआंगश्रीने स्वत:ची ओळख निर्माण केली. वयाच्या २१ व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर जगभरात प्रसिद्ध झाली.(inspirational story of Miss World) तिचे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक कार्याकडे असलेला कल यामुळे तिला मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले. (Miss World cancer survivor)
इतकेच नाही तर ती मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकवणारी महिला आहे.(Miss World 2025 winner story) लहान वयात तिने १०८ देशातील प्रतिस्पर्ध्यांना हरवून नवीन कामगिरी केली.(beauty queen inspirational journey) या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने तिला एक प्रश्न विचारला तिच्या उत्तराच्या आधारे तिची मिस वर्ल्ड म्हणून निवड झाली. (Miss World life struggle)
घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके
तिच्या वडिलांचे नाव थानेट डोंकमनर्ड आणि आईचे नाव सुपात्रा चुआंगश्री आहे. फुकेतमधील हॉटेलमध्ये तिने लहानपणापासून कुटुंबासोबत काम केले. तेव्हापासून तिच्या संवाद कौशल्याची कला विकसित झाली. इतकेच नाही तर विविध संस्कृती समजून घेण्याची संधी तिला मिळाली. तिच्या यशाचा सगळ्यात मोठा भाग ही आई-वडिलांच्या संस्काराला देते.
थाई, इंग्रजी आणि चिनी (मंदारिन) या भाषेवर ओपलचे प्रभुत्व आहे. तिच्या संवाद साधण्याचे कौशल्य मिस वर्ल्डच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले. तिला मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांमध्ये अधिक आवड आहे असं तिने म्हटलं.
वयाच्या १६ व्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग जडला होता. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर तिने महिलांच्या आरोग्यासाठी 'ओपल फॉर हर' नावाची मोहिम सुरु केली. जी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता पसरवते. ही मोहिम तिच्या वैयक्तिक अनुभवातून प्रेरणा देणारी आहे. तसेच महिलांना स्तनांच्या आरोग्यावर त्याचे लवकर निदानावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करते.
२०२१ साली तिच्या करिअरला सुरुवात झाली. २०२२ मध्ये मिस युनिव्हर्स थायलंडमध्ये ती दुसरी उपविजेती ठरली. त्यानंतर २०२४ मध्ये तिने मिस युनिव्हर्समध्ये थायलंडचे प्रतिनिधित्व केले आणि ती तिसरी उपविजेती ठरली. २०२५ मध्ये मिस वर्ल्डमध्ये सहभागी होऊन विश्वसुंदरी होण्याचा मान तिने पटकावला.