Lokmat Sakhi >Inspirational > ७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...

७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...

Bihar farmer success story: Rajkumar Singh daughters in police: Bihar family's achievement: Empowered daughters in police service: Women in uniform from Bihar: Inspiring Bihar family: Bihar police jobs for women: Father's role in daughters' success: बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ७ मुलींनी पोलिस अधिकारी बनून अनोखे उदाहरण ठेवले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 11:51 IST2025-03-23T11:51:16+5:302025-03-24T11:51:53+5:30

Bihar farmer success story: Rajkumar Singh daughters in police: Bihar family's achievement: Empowered daughters in police service: Women in uniform from Bihar: Inspiring Bihar family: Bihar police jobs for women: Father's role in daughters' success: बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ७ मुलींनी पोलिस अधिकारी बनून अनोखे उदाहरण ठेवले आहे.

meet bihar farmer father success story Rajkumar singh 7 daughters got government job in police now protect the nation | ७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...

७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...

भारत आजही संस्कृती आणि कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.(Bihar farmer success story) आपल्या कुटुंबाचा वंश चालवण्यासाठी आजही मुलगाच हवा अशी मानसिकता अनेकांमध्ये पाहायला मिळते. मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास आजही अनेक ठिकाणी आहे.(Rajkumar Singh daughters in police) परंतु, मुली देखील आपल्या घराचे, कुळाचे नाव मोठे करु शकतात याच उत्तम उदाहरण म्हणजे बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ७ मुलींनी पोलिस अधिकारी बनून अनोखे उदाहरण ठेवले आहे. त्यांचे नाव आहे राजकुमार सिंह.(Bihar family's achievement) 
सध्या भारतीय समाजातील विविध जुने समज आणि विचार बदलताना दिसत आहे.( Empowered daughters in police service) याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिहारमधील एक शेतकरी कुटुंब. यांच्या ७ ही मुली सरकारी नोकरी करत आहेत. त्यांच्या पालकांना अपार अभिमान आणि सन्मान मिळवून देत आहेत.(Women in uniform from Bihar) राजकुमार सिंह यांना मुलींच्या जन्मानंतर अनेकांचे टोमणे खावे लागले. पण आज मुलींचे यश पाहून लोक त्यांचा आदर करतात.

उन्हाळ्यात एसीचे बिल पाहून घाम फुटतो? ७ सोप्या टिप्स, बिल येईल कमी- मिळेल गारेगार हवेचं सुख

त्यांची मोठी मुलगी राणी कुमारी सिंह ही बिहार पोलिस खात्यात देशाची सेवा करते. सध्या तिची जमुई येथे पोस्टिंग झाली आहे. बीए शिक्षण घेतलेली राणीने दोन मुले झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. २००९ मध्ये बिहार पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेत उत्तीर्ण झाली पण भरतीत विलंब झाल्याने २०२१ मध्ये ती पोलिस दलात सामील झाली. तिचा पती नीरज शिवनमध्ये वाहतूक क्षेत्रात काम करतो. 

दुसरी मुलगी रेणू कुमारी बीए पदवीधर आहे. २००८ मध्ये तिची पोलिस खात्यात निवड झाल्यापासून नेपाळच्या सीमेवर ती तैनात आहे. गोरखपूरमधील महाराजगंज येथे एसएसबी कॉन्स्टेबल म्हणून काम करते. तिचे पती मंटू कुमार सिंह हा देखील एसएसबी कॉन्स्टेबल आहे. जे बिहारमधील जलालपूर शिवन येथे राहतात. त्यांची तिसरी मुलगी सोनी हिने देखील मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवले. २०२१ मध्ये सीआरपीएफमध्ये ती सामील झाली. सध्या दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग झाली आहे. 

आई नसती, तर मी.. ! नितांशी गोयल उर्फ फूलकुमारी सांगते, मी ही लापताच असते जर..

चौथी मुलगी प्रीती सिंह ही अविवाहित असून २०१५ मध्ये ती बिहारच्या पोलीस खात्यात  भरती झाली. ती सध्या बिहारमधील अरवल येथे गुन्हे शाखेत कार्यरत आहे. पिंकी सिंह ही पाचवी मुलगी असून २०१६ साली बिहार उत्पादन शुल्क विभागात तिची निवड झाली. सध्या तिची पोस्टिंग शिवन येथे झालीये. सहावी मुलगी रिंकू सिंह ही बिहार पोलिस कॉन्स्टेबल खात्यात आहे. २०१८ साली तिची निवड झाली. ती सध्या एसपी ऑफिसमध्ये काम करते. सर्वात लहान मुलगी नन्ही सिंह हिने मोठ्या बहि‍णींप्रमाणेच यशाची नवी कहाणी लिहिली. २०१८ मध्ये बिहार पोलिस भरती परीक्षेत तिची निवड झाली. सध्या ती जीआरपी पटना येथे काम करते आहे. 

Web Title: meet bihar farmer father success story Rajkumar singh 7 daughters got government job in police now protect the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.