Join us
Daily Top 2Weekly Top 5

Diaksha Makkar : कष्टाचं फळ! ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UGC-NET मध्ये 'टॉप', दीक्षाच्या जिद्दीला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:49 IST

Diaksha Makkar : दीक्षाने ५ व्या प्रयत्नात UGC NET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. सलग चार वेळा अपयशी ठरल्यानंतर पाचव्या प्रयत्नात तिने थेट इतिहास रचला.

सतत मेहनत करूनही आपल्याला अपेक्षित निकाल मिळत नाही. अशा वेळी आपण आशा सोडू लागतो. पण जेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात उतरतं तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही. अंबाला येथील दीक्षा मक्कड हिच्याबाबतही असंच काहीसं घडलं आहे. दीक्षाने तिच्या ५ व्या प्रयत्नात UGC NET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. सलग चार वेळा अपयशी ठरल्यानंतर पाचव्या प्रयत्नात तिने थेट इतिहास रचला.

पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील लोकप्रशासन विभागातील पीएचडी संशोधक असलेल्या दीक्षाचा हा प्रवास संघर्ष आणि परिश्रमाने भरलेला आहे. प्रत्येक अपयशानंतर तिने स्वतःला अधिक सुधारलं. आज तिचं यश लाखो उमेदवारांसाठी प्रेरणास्थान बनलं आहे. दीक्षाने सांगितलं की, UGC-NET मध्ये ऑल इंडिया रँक १ (AIR 1) पटकावला आहे. गेल्या ३ वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होती. हे करणं खूप कठीण होतं, पण माझे आई-वडील आणि शिक्षकांच्या विश्वासामुळे हा प्रवास सुसह्य झाला.

अभिमानास्पद! विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

पाचव्या प्रयत्नात देशात पहिली येण्याचा मान  दीक्षासाठी हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. पहिल्या प्रयत्नात तिला परीक्षेचं स्वरूप लक्षात आलं. दुसऱ्या प्रयत्नात तिची कामगिरी सुधारली, पण तिसऱ्या प्रयत्नात यश न मिळाल्याने ती निराश झाली. चौथ्या प्रयत्नानंतर तर तिने जवळपास हारच मानली होती. मात्र तिच्या सुपरव्हायझरनी तिला पुन्हा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन दीक्षाने पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आणि पाचव्या प्रयत्नात देशात पहिली येण्याचा मान मिळवला.

मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम! ८ महिन्यांच्या गरोदर मेघना सज्जनार यांची कमाल; सुवर्णपदकावर कोरलं नाव

यशात पालकांचं मोठं योगदान

आपल्या यशाबद्दल बोलताना दीक्षा म्हणाली की, "माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि आई-वडील यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं." तिने ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून आपली तयारी मजबूत केली होती. सातत्यपूर्ण सराव आणि उजळणीचा तिला मोठा फायदा झाला.

भविष्यातील स्वप्न - असिस्टंट प्रोफेसर

UGC NET परीक्षेत अव्वल आल्यानंतर दीक्षाला तिच्या पुढील वाटचालीबद्दल विचारण्यात आलं. तिला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे. तिला रिसर्च, अकॅडमिक्स आणि टीचिंगची मनापासून आवड आहे. याशिवाय तिला नागरी सेवा परीक्षेतही रस असून ती त्याचीही तयारी करू इच्छिते. आपली यशोगाथा सांगताना तिने नवीन उमेदवारांना सल्ला दिला की, तयारी करताना 'शॉर्ट टर्म' आणि 'लॉन्ग टर्म' ध्येय ठेवणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Perseverance pays off: Diksha tops UGC-NET after four failed attempts.

Web Summary : Diksha Makkad, after four failures, topped the UGC-NET exam on her fifth try. Driven by her supervisor's encouragement, this PhD scholar secured All India Rank 1. She aims to become an assistant professor and advises aspirants to set short-term and long-term goals.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी