Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन पिढ्या, एक ध्येय! माय-लेकी एकाचवेळी होणार डॉक्टर; NEET परीक्षेत दोघींनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:26 IST

एका आईने आणि मुलीने एकत्र NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

चेन्नईतून एक अत्यंत प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एका आईने आणि मुलीने एकत्र NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील ४९ वर्षीय गृहिणी अय्यरमुथु अमुथवल्ली आणि त्यांची मुलगी सुसान्या आता एकत्र MBBS चा अभ्यास करणार आहेत. मुलीची जिद्द पाहून आईनेही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवून दाखवलं.

अमुथवल्ली या लग्नापूर्वी एका खासगी शाळेत बायोलॉजीच्या शिक्षिका होत्या. मात्र लग्नानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि त्या पूर्णपणे संसारात रमल्या. जेव्हा त्यांच्या मुलीने NEET ची तयारी सुरू केली, तेव्हा अमुथवल्ली यांनीही स्वतः ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मुलीसोबत बसून त्यांनी पुस्तकं वाचली, नोट्स काढल्या आणि दररोज तासनतास मेहनत घेतली.

तीन वेळा अपयश

अमुथवल्ली यांनी सांगितलं की, त्यांनी यापूर्वी तीनदा NEET परीक्षा दिली होती, परंतु त्यांना यश मिळालं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात अखेर त्या यशस्वी झाल्या. या परीक्षेत त्यांना २९३ गुण मिळाले आहेत, तर त्यांची मुलगी सुसान्या हिला ४५७ गुण मिळाले आहेत. गुणांच्या जोरावर आईला सरकारी कॉलेज मिळालं नसलं तरी त्यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कष्टाचं फळ! ४ वेळा अपयश, ५ व्या प्रयत्नात UGC-NET मध्ये 'टॉप', दीक्षाच्या जिद्दीला सलाम

"माझी आईच माझी प्रेरणा"

सुसान्या म्हणते की, माझी आईच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. जेव्हा मी पाहिलं की माझी आई माझ्यासोबत तितक्याच चिकाटीने अभ्यास करत आहे, तेव्हा माझा उत्साह अधिकच वाढला. या माय-लेकी दररोज एकत्र अभ्यास करायच्या, एकमेकींना प्रश्न विचारायच्या आणि एकमेकींच्या चुका दुरुस्त करायच्या.

अभिमानास्पद! विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

वय नाही, तर जिद्द महत्त्वाची

अमुथवल्ली यांची ही गोष्ट सिद्ध करते की, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. जर जिद्द पक्की असेल आणि प्रियजनांची साथ असेल, तर कोणतेही ध्येय कठीण नसतं. वयाच्या ४९ व्या वर्षी NEET उत्तीर्ण होणं हे एक मोठं उदाहरण आहे, जे देशभरातील महिलांसाठी आणि गृहिणींसाठी प्रेरणादायी ठरेल.

मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम! ८ महिन्यांच्या गरोदर मेघना सज्जनार यांची कमाल; सुवर्णपदकावर कोरलं नाव

आता एकत्र 'व्हाईट कोट' घालण्याचं स्वप्न

एकाच वेळी डॉक्टर बनून 'व्हाईट कोट' घालून रुग्णांची सेवा करण्याचं या माय-लेकींचं स्वप्न आहे. हे केवळ एका परीक्षेतील यश नसून एक भावनिक प्रवास आहे. आई-मुलीचं नाते केवळ प्रेमापुरतं मर्यादित नसून त्या एकमेकींच्या यशाच्या भागीदारही होऊ शकतात, हेच यातून दिसून येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother and daughter crack NEET together, set doctor goal!

Web Summary : A mother and daughter from Tamil Nadu cleared the NEET exam together. The 49-year-old mother, inspired by her daughter, will now study MBBS alongside her, proving that age is no barrier to achieving dreams. They aim to serve patients together.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीडॉक्टर