lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर..

तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर..

India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years : तब्बल २१ वर्षांनी मिस वर्ल्डचा क्राऊन भारताकडे परत आला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 11:06 AM2022-12-19T11:06:06+5:302022-12-19T11:13:46+5:30

India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years : तब्बल २१ वर्षांनी मिस वर्ल्डचा क्राऊन भारताकडे परत आला आहे.

India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years | तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर..

तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर..

जम्मू येथे राहणाऱ्या, पेशाने शिक्षिका व मॉडेल असणाऱ्या सरगम कौशल हिने भारतीयांना गर्व वाटावा असा अभिमानास्पद क्षण आठवणीत दिला आहे. अमेरिकेमध्ये आयोजित मिसेस वर्ल्ड २०२२ - २३ या कॉम्पिटिशनमध्ये सरगम कौशल हिने 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा ' किताब जिंकून भारतीयांचा आनंद द्विगुणित केला आहे. यापूर्वी २००१ साली अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिने 'मिस वर्ल्ड' होण्याचा किताब जिंकला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हा मिस वर्ल्डचा क्राऊन भारताकडे परत आला आहे. अमेरिकेच्या लासवेगास (Las Vegas) भागात झालेल्या मिसेस वर्ल्ड २०२२ या कॉम्पिटिशनमध्ये परीक्षकांकडून सरगम कौशल हिला 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा ' किताब देऊन क्राऊन घालण्यात आला. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉश्यूम डिझायनर मौसमी मेवावाला, आणि पूर्व  मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर उपस्थित होते. भारताकडे तब्बल २१ वर्षानंतर मिसेस वर्ल्ड २०२२ चा क्राऊन आला आहे. तिच्या कामगिरीमुळे भारतायांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे सरगमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years).

काय आहे या व्हिडीओ मध्ये... 
सरगम कौशलने 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' चा किताब जिंकल्यानंतर मोठ्या मानाने तो क्राऊन डोक्यावर घालतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये, सरगम कौशल मिसेस वर्ल्डच्या मंचावर पिंक रंगाचा गाऊन परिधान करून उभी आहे. सरगमने (Sargam Koushal) मिसेस पॉलिनेशियाला (Mrs. Polynesia) हरवून या किताबावर आपले नाव कोरले आहे. हा क्राऊन परिधान करून झाल्यानंतर तिने भावुक होऊन सगळ्यांचे आभार मानले. 

 

 

अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची पोस्ट चर्चेत... 
याप्रसंगी, मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या अदिती गोवित्रीकर हिने एक पोस्ट शेअर करत सरगम कौशलचे अभिनंदन व आनंद व्यक्त केला आहे. "हार्दिक अभिनंदन @sargam3 @mrsindiainc या जर्नीचा एक भाग बनून मी खूप खुश आहे... ही तीच वेळ आहे... जेव्हा २१ वर्षानंतर मिसेस वर्ल्डचा ताज परत आला आहे.   

कोण आहे सरगम कौशल ?
'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंच करणारी सरगम कौशल ही जम्मूची रहिवासी आहे. ती पेशाने शिक्षिका आणि मॉडेल आहे. सरगम कौशल २०१८ साली विवाहबद्द झाली असून तिचे पती भारतीय नौदलात कार्यरत आहेत. लग्नानंतर लगेच तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२२ मध्ये तिने मिसेस  इंडिया मध्ये भाग घेतला.

Web Title: India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.