भारताच्या २० वर्षांखालील महिला फुटबॉल टीमने १० ऑगस्ट रोजी यांगूनमधील थुवुन्ना स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या ग्रुप डी सामन्यात म्यानमारचा १-० असा पराभव केला. या विजयासह भारत दोन दशकांत प्रथमच AFC (आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन) च्या २० वर्षांखालील महिला आशियाई कपसाठी क्वालीफाय झाला आहे. भारत शेवटचा २००६ मध्ये AFC U20 महिला आशियाई कपसाठी क्वालिफाय झाला होता.
भारताच्या २० वर्षांखालील महिला संघाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि ग्रुप डी पात्रता मोहिमेत अपराजित राहिला. या मोहिमेत त्यांनी इंडोनेशिया (०-०) आणि तुर्कमेनिस्तान (७-०) विरुद्ध सामने खेळले. त्यानंतर, त्यांनी यजमान म्यानमारचा १-० असा पराभव केला. त्यांनी एकही गोल केला नाही.
✨ 𝐐𝐔𝐀𝐋𝐈𝐅𝐈𝐄𝐃 ✨
— AFC Women’s Football (@TheAWCL) August 10, 2025
🇮🇳 India can look forward to making their mark at 2026 #U20WAC Finals! pic.twitter.com/nnNR5jNE6q
एएफसी अंडर-२० महिला आशियाई कप २०२६ च्या क्वालिफायरच्या ११ स्थानांसाठी एकूण ३२ टीम स्पर्धा करत आहेत. थायलंड यजमान असल्याने आधीच क्वालिफिकेशन मिळवलं आहे. क्वालिफायरमध्ये टीमला प्रत्येकी चार गटांच्या आठ गटांमध्ये विभागलं गेलं आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २० वर्षांखालील महिला राष्ट्रीय टीमला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २५,००० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे २२ लाख रुपये) बक्षीस जाहीर केलं आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) च्या सहकार्याने एआयएफएफने महिला फुटबॉलमध्ये युवा रचना मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. एआयएफएफने एका निवेदनात म्हटलं आहे की, "भविष्याकडे पाहता, एआयएफएफ एप्रिल २०२६ मध्ये थायलंडमध्ये होणाऱ्या एएफसी अंडर-२० महिला आशियाई कप २०२६ साठी सर्वोत्तम तयारी सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे."
"प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी आणि संघासाठी उच्च दर्जाचा आंतरराष्ट्रीय अनुभव सुनिश्चित करण्यासाठी फेडरेशन सर्वांसोबत काम करेल. फेडरेशनचे उद्दिष्ट केवळ प्रशिक्षणाद्वारे खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त करणं नाही तर त्यांना आशियातील सर्वोत्तम टीमविरुद्ध खेळण्यासाठी तयार करणं आहे."
AIFF announces reward for India U20 Women’s Team 🇮🇳
— Indian Football Team (@IndianFootball) August 10, 2025
More details 🔗 https://t.co/oxvtUUkik5#U20WAC#YoungTigresses#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/vZ6Nsgrr0o