केरळच्या निसा उन्नीराजन यांनी स्वप्नांना वय नसतं हे सिद्ध केलं आहे. त्यांचा हा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा त्या दोन लहान मुलींची आई होत्या. नोकरी करत होत्या आणि घर सांभाळायच्या. रात्रीच्या शांततेत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करायच्या. निसा यांना कमी ऐकायला येतं. पण याकडे अडथळा म्हणून पाहण्याऐवजी, त्यांनी ती एक संधी म्हणून पाहिलं.
निसा यांचं यश हे फक्त त्यांचं नव्हतं. तर पती अरुण आणि सासरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले. निसा एका मुलाखतीत म्हणाल्या की, "माझे पती आणि सासऱ्यांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं."
परीक्षेची काळजीपूर्वक तयारी केली. यूपीएससी अभ्यासक्रमाचे लहान भागांमध्ये विभाजन केलं आणि लवकर रिव्हीजन करता यावी यासाठी तपशीलवार नोट्स तयार केल्या. प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी, त्या अनेकदा इतर यूपीएससी टॉपरच्या यशोगाथा वाचत असे आणि त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेत असे. निसा सहा वेळा अपयशी ठरल्या.
निसा यांचा हा प्रवास खूप मोठा होता. यश एका रात्रीत मिळालं नाही; त्यासाठी त्यांना सात वेळा प्रयत्न करावे लागले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रमाचे फळ अखेर मिळालं. २०२४ मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात १००० वा रँक मिळवला. परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्या, तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. आयएएस निसा उन्नीराजन तिरुवनंतपुरममध्ये सहाय्यक ऑडिट अधिकारी म्हणून काम करतात.
