Join us

माऊली पेपर द्यायला गेली; बापानं लेकरासाठी झाडाला झोळी बांधली आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:05 IST

HSC 12th Exam Inspirational Stories : लेकरासाठी आईबाप कष्ट घेतातच, पण इथं शिक्षणाची कळकळही प्यारी आहे लेकराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी

राज्यभरात बारावीच्या परिक्षांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचं तितकंच तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. वर्षभर केलेल्या मेहनत या दिवसात कामी येत असते. याच परिक्षेच्या निकालावर मुलाचचं भवितव्य कसं असणार हे ठरतं. परिक्षा केंद्राबाहेरचा एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही त्या एका बापाचं कौतुक वाटेल. (HSC 12th Exam Inspirational Stories) 

एक महिला आपल्या बाळाला पतीकडे सोडून परिक्षा केंद्रावर परिक्षा द्यायला गेली. यावेळी लहान बाळ रडत असल्यानं वडीलांनी मनात कोणतीही शंका न आणता परिक्षा केंद्राच्या बाहेरच्या आवारातील झाडाला साडीची झोळी बांधली आणि बाळाला झोपवलं. पत्नीचा पेपर लिहून पूर्ण होईपर्यंत ते कर्तव्य भावनेने बाळाचा व्यवस्थित सांभाळ करत होते.  हा फोटो व्हायरल झाल्यानंतर परिक्षा केद्राबाहेर बांधलेल्या झोक्याची राज्यभरात चर्चा होत आहे.

ना पायात शूज, ना खेळायला मैदान; पण पोरगी अशी खेळते की क्रिकेटचा देवही झाला तिचा 'फॅन!

इच्छा तेथे मार्ग या वाक्याचा प्रत्यय येईल असं हे दृश्य होतं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव नंदिनी साबळे असून सेनगाव तालूक्यातील  केंद्रा बुद्रक येथील अमृतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात परभणी येथील महिलेनं आजेगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने ती महिला बाळासह परिक्षा देण्यास तेथे पोहोचली. 

बाळाला जन्म दिल्यानंतर परिक्षा केंद्रात पेपर लिहायला पोहोचली.

बिहारमध्ये एका महिलेनं आपल्या  बाळाला जन्म दिला आणि त्यानं १० वीची परिक्षा द्यायला पोहोचली.  २२ वर्षांची रुक्मिणी कुमारी या महिलेनं सकाळी बाळाला जन्म दिला आणि ३ तासांनी बिहार बोर्डची परिक्षा द्यायला पोहोचली. माध्यमांची संवाद साधताना तिनं सांगितलं की, ''मंगळवारी जेव्हा मी गणिताचा पेपर लिहीला तेव्हा खूपच त्रास होत होता. विज्ञानाचा पेपर लिहिल्यानंतर मी खूपच उत्साही होती दुसऱ्या दिवशीचा पेपर लिहण्यासाठी उत्सुक होती. पण रात्री उशीरा मला रुग्णालयात जाव लागलं आणि सकाळी ६ वाजता बाळाला जन्म दिला.''

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी12वी परीक्षाहिंगोली