lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > प्रजासत्ताक दिन विशेष : २६ जानेवारी परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकारी

प्रजासत्ताक दिन विशेष : २६ जानेवारी परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकारी

First time women army officers from artillery regiment to be part of Republic Day parade : भारतीय महिलांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. तोफखाना रेजिमेंटमधील अधिकारी होणार परेडमध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 01:28 PM2024-01-25T13:28:31+5:302024-01-25T13:35:45+5:30

First time women army officers from artillery regiment to be part of Republic Day parade : भारतीय महिलांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. तोफखाना रेजिमेंटमधील अधिकारी होणार परेडमध्ये सहभागी

First time women army officers from artillery regiment to be part of Republic Day parade Republic Day Special: For the first time women officers of the artillery regiment will participate in the 26 January parade | प्रजासत्ताक दिन विशेष : २६ जानेवारी परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकारी

प्रजासत्ताक दिन विशेष : २६ जानेवारी परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकारी

भारताचा यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन. २६ जानेवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीमध्ये राजपथावर होणारी परेड हे या दिवसाचे मुख्य आकर्षण असते. कर्तव्य पथ या ठिकाणी पार पडणाऱ्या या परेडमध्ये दरवर्षी काही ना काही वैशिष्ट्य असते. या परेडमध्ये सैन्यदलातील महिलांचा सहभाग आणि नेतृत्त्व ही गेल्या काही वर्षातील नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. यंदा पहिल्यांदाचा तोफखाना रेजिमेंटच्या महिला अधिकारी या परेडमध्ये सहभागी होणार आहेत (First time women army officers from artillery regiment to be part of Republic Day parade).

भारतीय सैन्यदलात मागील वर्षी पहिल्यांदाच तोफखाना रेजिमेंटमध्ये महिलांचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या ४ जणी २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय सैन्यातील तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेल्या या पहिल्याच महिला अधिकारी असून महिलांचा या रेजिमेंटमधील सहभाग हे सैन्यदल आणि महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

या महिला अधिकारी यांत्रिकी स्तंभावरील ड्रोन जॅमिंग सिस्टीम, प्रगत रेडिओ फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग सिस्टीम, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सची ब्रिजिंग सिस्टीम तसेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली यावर कार्यरत असतील. याशिवायही लष्कराच्या इतरही काही तांत्रिक उपकरणांचे प्रदर्शन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार करणार आहेत. तर डेप्युटी कमांडर मेजर जनरल सुमित मेहता असतील .फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून परेडला उपस्थित राहणार आहेत. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय हवाई दलाची ५१ विमाने कर्तव्य पथावरुन उड्डाण करणार आहेत. हवाई दलाच्या संचलन तुकडीचे नेतृत्त्वही महिला अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे.
 

Web Title: First time women army officers from artillery regiment to be part of Republic Day parade Republic Day Special: For the first time women officers of the artillery regiment will participate in the 26 January parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.