Join us
Daily Top 2Weekly Top 5

Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:09 IST

Madhavi Latha : माधवी लता चिनाब पूल प्रोजेक्टच्या भू-तंत्रज्ञान सल्लागार होत्या आणि त्यांनी १७ वर्षे या प्रोजेक्टवर काम केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब पुलाचं उद्घाटन केलं. हा पूल इंजिनिअरिंगचं एक अद्भुत उदाहरण असून जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हा महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांमध्ये  बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्रोफेसर माधवी लता यांचा समावेश आहे. माधवी लता चिनाब पूल प्रोजेक्टच्या भू-तंत्रज्ञान सल्लागार होत्या आणि त्यांनी १७ वर्षे या प्रोजेक्टवर काम केलं आहे.

माधवी लता सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रोफेसर आहेत. डॉ. लता यांनी १९९२ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. त्यानंतर माधवी लता यांनी वारंगल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून गोल्ड मेडलसह एमटेक पदवी प्राप्त केली.

चिनाब पुलाच्या बांधकामात होती अनेक आव्हानं 

२००० मध्ये आयआयटी-मद्रास येथून भू-तंत्रज्ञान इंजिनिअरिंगध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. भू-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील मोठ्या शास्त्रज्ञ आहेत आणि २०२१ मध्ये त्यांना इंडियन जिओटेक्निकल सोसायटीने बेस्ट जियोटेक्निकल रिसर्चर पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या भौगोलिक परिस्थितीमुळे चिनाब पुलाच्या बांधकामात अनेक आव्हानं होती. डोंगराळ भागात बांधकाम करणं हे खूप कठीण काम होतं. 

प्रत्येक आव्हानावर केली मात

डॉ. माधवी लता यांच्या टीमने चिनाब पुलाच्या बांधकामात 'अ‍ॅज यू गो' या दृष्टिकोनाचा अवलंब केला आणि प्रत्येक आव्हानावर मात केली. डिझाईन अ‍ॅज यू गो म्हणजे प्रत्येक आव्हानाला रिअल-टाइम आधारावर सामोरं जावं लागलं, जसं की तुटलेले खडक, गुहा आणि वेगवेगळ्या खडकांचे गुणधर्म, रिअल-टाइममध्ये डिझाईनमध्ये बदल केले गेले आणि त्यावर उपाय शोधण्यात आलं.

रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी १,४८६ कोटी खर्च

डॉ. माधवी लता यांच्या टीमने बांधकामादरम्यान डिझाइनमध्ये बदल केले. पुलाची मजबुती आणि स्थिरतेबाबत महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या. त्यांनी अलीकडेच इंडियन जिओटेक्निकल जर्नलच्या महिला विशेष अंकात 'डिझाइन अ‍ॅज यू गो: द केस स्टडी ऑफ चिनाब रेल्वे ब्रिज' या हेडिंगसह एक पेपर प्रकाशित केला आहे. पुलाची रचना सतत कशी विकसित होत गेलं हे या पेपरमध्ये आहे. चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी १,४८६ कोटी रुपये खर्च आला. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी