Join us
Daily Top 2Weekly Top 5

#Breakthebias : आई म्हणून मला कुणाचं सर्टिफिकेट नको! सनी लिओनी सांगतेय, आईपणाचा तिचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 13:17 IST

#Breakthebias : सनी लिओनी ( Sunny Leone). तिला नेहमी तिच्या कामावरूनच तिला ओळखलं जातं.. आता तर तिच्या आईपणावरही टीका करणारे कमी नाहीत.

ठळक मुद्दे माझ्यावर सर्रास टिका करणाऱ्यांनी ५ मिनिटे का होईना पण माझ्या जागी येऊन विचार करावा. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला कसं वाढवायचं हे माहिती असतं, मलाही माहिती आहे.

सनी लिओनी. ( Sunny Leone) पॉर्नस्टार सनी लिओनी अशीच तिची आजही ओळख. त्यामुळे तिच्याकडे नेहमी त्याच चष्म्यातून बघितलं जातं. तिच्या प्रत्येक कृतीवर, तिच्या कामावर किंवा वैयक्तिक आयुष्यातही ती कशी वागते, बोलते यावर कायम एक विशिष्ठ लेबल लावून ठपका ठेवला जातो. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन तर तिला ट्रोल करणं नेहमीचंच. पॉर्नस्टार सनीचे फोटो, तिच्या क्लिप्स यामध्ये अनेकांना रस मात्र त्याचवेळी मर्यादा आणि बाईपणाचे कर्तव्य यावरही तेच लोक बोलतात. त्यातच एक नवा मुद्दा सनी लिओनीच्या मुलांचा. एक पोर्न स्टार मुलगी काय दत्तक घेते, सरोगसीने मुलं काय जन्माला घालते. ती आई म्हणून त्यांना काय संस्कार करणार असे शेरे मारणारे अनेकजण. सनी मात्र हे सगळे समज, तिच्यावरची टीका, तिचं पोर्नस्टार असणं हे सारं बाजूला ठेवून आपल्या लेकरांची ‘आई’ झाली आहे. 

 

 सनी लिऑनीला तीन मुलं,  तिची ही मुलं म्हणजे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व आहेत. यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी तिला सरोगसीद्वारे झाले असून एक मुलगी तिने दत्तक घेतली आहे. ग्रामीण भागातल्या या मुलीला जेव्हा सनीने दत्तक घेतलं तेव्हाही तिला टिकेचं धनी व्हावं लागलं.  आरोप तोच, पोर्नस्टार काय आई होणार?कुणी पब्लिसिटी स्टंट म्हणूनही नावं ठेवली.सनी मात्र यासाऱ्याच्या पल्याड आपल्या लेकरांची काळजी घेतेय. ती पालकत्वाविषयी बोलते. एक उत्तम आई, पालक होण्याचा तिचा तिचा म्हणून संघर्ष आणि प्रवास सुरुच आहे.अलीकडेच डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सनी तिच्या आई होण्याविषयी, पालकत्वाविषयी बोलली आहे.

 

सनी सांगते, ‘माझ्या मुलांचा मी चांगला सांभाळ , पालनपोषण करत नाही, करु शकणार नाही असं म्हणून माझ्या पालकत्वाविषयी शंका घेणारे लोक माझ्या घरातले नाहीत. बाहेरचे आहेत. त्यांना माझ्या आईपणाच्या प्रवासाविषयी काय माहिती? त्यामुळे ते काय विचार करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मी माझ्या मुलांचा सांभाळ कसा करते, हे कुणाला समजावून सांगण्याची मला गरज नाही. मी स्पष्टीकरण कशाला द्यायची. माझ्यासाठी माझी मुलं, त्यांचं माझं नातं महत्त्वाचं, बाकी काही नाही. माझ्यावर सर्रास टिका करणाऱ्यांनी ५ मिनिटे का होईना पण माझ्या जागी येऊन विचार करावा. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला कसं वाढवायचं हे माहिती असतं, मलाही माहिती आहे. मी शिकतेय, पालक म्हणूनही. त्यामुळे जे माझ्यावर टीका करतात, त्यांना काय सांगणार, ग्रो अप एवढंच फार तर म्हणता येईल!

 

टॅग्स :जागतिक महिला दिनसोशल व्हायरलसनी लिओनीप्रेरणादायक गोष्टी