lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

बलजीत कौर नावाची हिमाचल प्रदेशातली तरुणी तिनं एका महिन्यात ८ हजार मीटरहून अधिक उंची असलेली चार हिमखिखरं सर करण्याचा विक्रम केला. ( Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 04:48 PM2022-05-31T16:48:25+5:302022-05-31T16:51:51+5:30

बलजीत कौर नावाची हिमाचल प्रदेशातली तरुणी तिनं एका महिन्यात ८ हजार मीटरहून अधिक उंची असलेली चार हिमखिखरं सर करण्याचा विक्रम केला. ( Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month)

Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month, Bus driver's daughter makes a record | एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

Highlights महिनाभरात चार उत्तुंग शिखरं सर करत एका नवा विक्रम केला. जिद्दीचा चेहरा आहे ही बलजीत.

जिद्द असेल मनात तर काय अशक्य आहे? हे वाक्य वरवर कितीही घिसपिटं वाटलं तरी ते खरंय हे सिध्द केलं ते बलजीत कौरने. ((Baljeet Kaur) गेल्या महिनाभरात तिचं नाव वृत्तपत्रांत कमी अधिकवेळा छापून आलं. गाजलं असं म्हणता येणार नाही कारण नसत्या वादात हरवलेल्या चर्चेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या बलजीतच्या यशाचं कौतुकही मागे पडलं. पण तिला ना त्याची फिकीर आहे ना तिनं त्यासाठी काही केलं. तिनं जे करुन दाखवलं ते केवळ आणि केवळ तिचं झपाटलेपण आहे. आणि एका दुर्दम्य झपाटलेपणाचा आणि अफाट मेहनतीचा चेहरा आहे. बलजीत कौर. हिमाचली ही तरुणी. तिनं एका महिन्यात हिमायलयाच्या पर्वतरांगा अक्षरण: पायाखाली घातल्या आणि केवळ एका महिन्यात ८ हजार मिटर उंची असलेली चार उत्तुंग हिमशिखरं सर केली. कुणाही भारतीय गिर्यारोहकानं केलेली ही आजवरची सगळ्यात विक्रमी कामगिरी. चारही शिखरं एका महिन्यात सर करणारी ती पहिली भारतीय गिर्यारोहक ठरली आहे.

(Image : Google)

बलजीतने २८ एप्रिलला अन्नपूर्णा शिखर सर केले. १२ मे रोजी कांचनजुंगा आणि २२ मे ला एव्हरेस्ट, २३ मे ल्होत्से सर केले. एकामागून एक शिखरं सर करण्याचा विक्रम करताना तिच्या फिजिकल फिटनेसचा कस लागला असणार हे तर उघडच आहे. एक शिखर सर करता करता आयुष्याची सारी ताकद लावावी लागते. इथं तर बलजीत चार चार शिखरांचं आणि जगातली उर्वरित शिखरं सर करण्याचीही स्वप्न पाहते आहे. आणि त्या स्वप्नांसह तिच्या पाठीशी उभी आहे तिची आहे. लेकीनं यशस्वी कामगिरी केल्यानंतर वृत्तपत्रांना मुलाखत देताना बलजीतची आई शांती म्हणाल्या, मेरी बेटी ने जो कर दिखाया है, वो हमारे लिये सबसे उंचा काम है!’
शेतकरी असणारी ही आई. हिमाचलप्रदेशातल्या कंधाघाट तालूक्यातल्या पंजरोल गावात राहणारं छोटं कुटुंब. थोडीच शेती. तिचे वडील अमरीक सिंग हिमाचल प्रदेश ट्रान्सपोर्ट कार्पेारेशनमध्ये म्हणजेच तिथल्या एसटीत बस ड्रायव्हर आहेत. या जोडप्याला चार मुलं. त्यातलीच एक बलजीत. ती जवळच्या गावात सरकारी शाळेत शिकली. शाळेत एनसीसीत भाग घेतल्यावर तिला पर्वत चढायची गोडी लागली. आपल्या आसपासचे सगळे लहानमोठे डोंगर ती त्याकाळात चढली. पहाडी मुलगी. पर्वतांशी तिची दोस्ती होतीच, ते तिला हाका मारु लागले.

(Image : Google)

बलजीतने फिटनेस ट्रेनिंगसह गिर्यारोहण शिकणं तर सुरु केलं. पण पैसे कुठून आणायचे मोठ्या मोहिमांसाठी हा प्रश्न होताच.
मात्र पैसे नाहीत म्हणून ती रडत बसली नाही. २०१५ पासून जमेल तसं तिनं मोहिमेच्या दृष्टीनं तयारी केली. लहानमोठी शिखरं सर केली. आणि मग नेमका कोरोनाकाळ आला. मोहिमेसाठी लागणारा पैसा कुठून येईल ते डोळ्यासमोर दिसेना.

(Image : Google)

बलजीत एका मुलाखतीत सांगते, मी स्वत: फिटनेस ट्रेनिंग करत असल्यानं मला ट्रेनिंगची उत्तम माहिती आहे. कोरोनाकाळात घरात बसावं लागणार हे कळल्यावर मग मी फिटनेस ट्रेनिंग क्लासेस घेतले. त्यातून जे पैसे मिळाले ते मी मोहिमेसाठी साचवत होते. पण तरी एवढे पैसे साचणार नव्हतेच पण निदान काम सुरु होतं. स्वत:चा फोकस आणि एकाग्रता, फिटनेस कायम ठेवण्यासाठी मी योगाभ्यास मेडिटेशन करतच होते. हळूहळू मोहिम प्रत्यक्षात येईल हे दिसू लागलं. आणि मग मी ठरवलं आता मोहिम फत्ते करायचीच.
तीच मोहिम तिनं फत्ते करुन दाखवली. महिनाभरात चार उत्तुंग शिखरं सर करत एका नवा विक्रम केला. जिद्दीचा चेहरा आहे ही बलजीत.

Web Title: Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month, Bus driver's daughter makes a record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.