Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल

ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल

at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles : भारताचे नाव उंचावणारी जिया राय कोण आहे? तिची कामगिरी जबरदस्तच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 16:47 IST2025-06-20T16:46:23+5:302025-06-20T16:47:44+5:30

at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles : भारताचे नाव उंचावणारी जिया राय कोण आहे? तिची कामगिरी जबरदस्तच.

at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles | ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल

ऑटीझमसह जगणारी १३ वर्षांची जिया खरी बहाद्दर! भारत श्रीलंका अंतर पोहण्यात केली कमाल

महिला प्रत्येक क्षेत्रात आजकाल बाजी मारताना दिसतात. एकेकाळी भारतात असा समज होता की क्रीडाक्षेत्र महिलांसाठी नाही मात्र सध्या याच क्षेत्रातून जागतिक ख्याती प्राप्त करणाऱ्या भारतकन्या भारताचे नाव उंचावताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिया राय. या मुलीने फार मोठा विक्रम स्वतःच्या नावावर करुन घेतला आहे.  पाहा कोण आहे जिया राय.

 

जिया ही १७ वर्षाची एक उत्कृष्ट पैरा स्विमर आहे. जियाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. मात्र त्यासह जगताना ती आपल्या क्षमता पूर्ण वापरत नवे विक्रम करते आहे ते ही अगदी लहान वयात. जिया एक आदर्श  मुलगी आहे. जिया मुंबईत राहते. डिसेंबर २०२२ मध्ये जिया ६ जणांच्या रिले टीमचा भाग होती. जियाच्या टिमने मुंबई ते गोवा आणि नंतर उलट वसई फोर्टपर्यंत ११०० किमी अंतर ११ दिवस, २२ तास आणि १३ मिनिटांत पार केले होते. 

२०२२ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी जियाने श्रीलंकेच्या तलाईमन्नारपासून भारतातील धनुषकोडीपर्यंत २९ किमी फक्त अंतर १३ तास आणि १० मिनिटांत पार केले होते. त्यानंतर जिया या मार्गावर पोहणारी सर्वात तरुण आणि वेगवान महिला स्विमर ठरली.  

जुलै २०२४ मध्ये जियाने आणखी एक टप्पा पार केला. ३४ किमी अंतराचे इंग्लिश चॅनेल जियाने १७ तास आणि २५ मिनिटांत पार केले. जिया ही कामगिरी करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान महिला पैरा स्विमर ठरली. जियाच्या यशामुळे तिला जगातील उत्तम जलतरणपट्टूंपैकी एक मानले जाते आहे. 


जियाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जियाला जगातील सातही महासागर पार करायचे आहेत त्यासाठी ती सध्या प्रशिक्षण घेत आहे. जिया समाजात ऑटिझमबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत असते.

Web Title: at 13 Jiya Rai becomes world's fastest Para Swimmer to cross Shri Lanka to India distance, struggling with Autism but she can do miracles