Join us  

पैशाचे व्यवहार प्रत्येक बाईला आलेच पाहिजेत कारण.. अभिनेत्री झीनत अमान महिलांना देतात एक महत्त्वाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 5:11 PM

Zinat Aman About Money Management Skill: पैशांच्या बाबतीत अगदी लहान वयापासूनच मुलींनी काही गोष्टी शिकून घ्यायला पाहिजेत, असं झीनत अमान यांचं मत आहे... बघा त्याविषयी त्यांनी महिलांना दिलेला एक खास सल्ला...

ठळक मुद्देत्या म्हणतात की पैशांचं व्यवस्थापन हे एक कौशल्याचं काम असून ते प्रत्येक महिलेला यायला हवं.

मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशांचं व्यवस्थापन ही कला महिलांना चांगली अवगत असते असं म्हणतात. म्हणूनच तर घरात काही आर्थिक अडचण आली तर तशाही परिस्थितीत त्या घरातल्या महिलेकडे बरोब्बर गरजेला पुरतील किंवा आला दिवस तारून नेतील, एवढे पैसे नक्कीच सापडतात. आहे त्या पैशातून बचत कशी करायची, हे महिलांना अगदी पक्कं ठावूक असतं. पण हे सगळं अशा घरगुती स्तरावर न करता भविष्यात खरोखरच उपयोगी येईल, अशा पद्धतीने व्हायला हवं... याच विषयी ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी महिलांना एक खास सल्ला दिला आहे. (Actress Zinat Aman explains about the importance of money management for every women)

 

आज आपण बघतो की शिकल्यासवरत्या असणाऱ्या अनेक महिलांना स्वत:चे बँकेचे व्यवहारही आत्मविश्वासाने करता येत नाहीत. स्वत:चा पैसा कशा पद्धतीने गुंतवावा, याची त्यांना व्यवस्थित माहिती नसते

चेहरा काळवंडला, त्वचा ड्राय दिसतेय? १ चमचा तिळाचा खास उपाय- संक्रांतीसाठी फेशियलची गरजच नाही

आणि ती समजून घेणेही अनेकींना गरजेचे वाटत नाही. एवढंच नाही तर आपल्या नवऱ्याची आर्थिक गुंतवणूक, संपत्ती, शेअर्स, म्युच्युअल फंड अशा बँक डिटेल्सही अनेकींना ठावूक नसतात. अशा प्रत्येकीसाठीच झीनत अमान यांनी दिलेला सल्ला मोठा उपयोगाचा ठरणारा आहे. 

 

झीनत अमान यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये झीनत अमान यांनी मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशांचे व्यवस्थापन याविषयी महिलांना एक खास सल्ला दिला आहे. त्या म्हणतात की पैशांचं व्यवस्थापन हे एक कौशल्याचं काम असून ते प्रत्येक महिलेला यायला हवं.

फक्त १० मिनिटांत होणारे बिनापाकाचे तिळाचे लाडू, चवदार लाडूंची झटपट होणारी रेसिपी

अगदी लहान वयापासून मुलींना आणि प्रत्येकालाच पैशाच्या व्यवस्थापनाबाबत धडे देण्याची गरज आहे. मनी मॅनेजमेंट करताना पहिल्यांदा चुकाल, दुसऱ्यांना चुकाल... पण हळूहळू शिकाल. पैशांच्या बाबतीत एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. सातत्य आणि चिकाटी असेल तर तुम्हालाही मनी मॅनेजमेंट व्यवस्थित जमेल, असं त्यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीझीनत अमानपैसागुंतवणूकमहिला