Lokmat Sakhi >Inspirational > प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस..

प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस..

Achnal Bhateja blind lawyer: inspirational story : प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो, हेच आंचल भटेजा हिने सिद्ध करुन दाखवलं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 11:09 IST2025-06-12T11:06:52+5:302025-06-12T11:09:49+5:30

Achnal Bhateja blind lawyer: inspirational story : प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो, हेच आंचल भटेजा हिने सिद्ध करुन दाखवलं.

achnal bhateja first blind women in supreme court of india to argue a case inspirational success story | प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस..

प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस..

तिनं जिद्द दाखवली आणि सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला आणि हा क्षण भारतीय न्याय व्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरला.(Achnal Bhateja blind lawyer) मुलांच्या पंखांना बळ देण्यासाठी आई-वडील देखील तितकीच मेहनत घेत असतात. प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो, हेच आंचल भटेजा हिने सिद्ध करुन दाखवलं. (First blind woman Supreme Court India)

पंजाबमधील भटिंडा येथे राहणाऱ्या आंचलने कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.(Inspirational story blind advocate) अंध असूनही ती आज सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. ६ जून रोजी तिने एक केस लढवली आणि तो दिवस तिच्यासाठी ऐतिहासिक होता.(Blind female lawyer Supreme Court case) ती सर्वोच्च न्यायालयात केस लढवणारी पहिली दृष्टिहीन महिला वकील बनली आहे. (Achnal Bhateja success story)

कशासाठी? पोटासाठी? मुंबईच्या लोकलपाठी! दोन घास खायलाही निवांतपणा न देणारा मुंबई लोकलमधला व्हायरल व्हिडिओ

जन्मत:च तिला डोळ्यांचा त्रास होता. हायस्कूल बोर्डाची परीक्षा देत असताना तिला आपली दृष्टी गमवावी लागली. क्षणभर तिला तिचे स्वप्न भंगल्यासारखे वाटले, पण पोरीने हार मानली नाही. एकामागून एक येणाऱ्या अडचणींवर मात करत तिने देशातील प्रतिष्ठित नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी मिळवली. 

सध्या ती लॉ फर्ममध्ये प्रॅक्टिस करत नाही तर सर्वोच्च न्यायालयात केसेसही लढवत आहे. ६ जून २०२५ हा तिच्या आयुष्यातील ऐतिहासिक दिवस होतात. तिने सर्वोच्च न्यायालयात केस वकिली करण्यासाठी हजेरी लावली आणि एक नवा विक्रम केला. तिच्या जिद्दीची, धाडशीची आणि तिच्या संघर्षांची चर्चा प्रत्येक घराघरात होत आहे. 

आपले स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी आचंलने दुप्पट मेहनत घेतली. तिच्या वडिलांना वाटले होती की, डोळ्यांमुळे तिचे शिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही. तिला तिच्यासाठी पुढे काय करावे असा मार्ग देखील मिळत नव्हता.पण ती हरली नाही, कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर तिने यश मिळवलं. दृष्टी गेल्यामुळे तिला खडतर प्रसंगांना सामोरे जावं लागलं. 

पंजाबमधील भटिंडा गावात तिची एका अंध व्यक्तीशी भेट झाली. जो स्क्रीन रीडरसह संगणक वापरत होता. त्याच्याकडून खूप काही शिकून, कठोर परिश्रम करत तिने डिजिटल अॅक्सेसिबिलिटी टूल्सचा वापर सुरु केला. ऑडिओबुक्सच्या मदतीने आपले शालेय शिक्षण पूर्ण करत बेंगळुरूमधील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU) मध्ये प्रवेश मिळवणारी ती पहिली अंध विद्यार्थिनी ठरली. कॉलेजच्या पहिल्या वर्षात, तिच्या परीक्षा लिहिण्यासाठी ती एका व्यक्तीची मदत घेत असे. त्यानंतर, तिच्या प्राध्यापकांनी तिला तिची उत्तरे टाइप करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला तिला संकोच वाटत होता, पण नंतर ती तिचा लॅपटॉप घेऊन परीक्षा हॉलमध्ये गेली आणि स्वतःच उत्तरे लिहू लागली. 

आंचलने २०२३ मध्ये लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि आता ती भारतातील आघाडीच्या लॉ फर्मपैकी एकामध्ये वकील म्हणून काम करत आहे. तिने तिचे संपूर्ण शिक्षण ऑडिओबुक्सच्या मदतीने पूर्ण केले. बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियामध्ये प्रवेश मिळवणारी ती पहिली अंध CLAT उमेदवारही ठरली. यासह तिने २०२३ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केली.

सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच हजर राहून, वकील आंचल भटेजा यांनी उत्तराखंड न्यायिक सेवा नागरी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) भरतीसाठी जाहिरात निघाली होती. त्यासाठी १०० टक्के अंध विद्यार्थ्यांनी जे आव्हान दिलं होतं, त्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान तिने आपला युक्तीवाद केला. हा युक्तीवाद न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एस.सी. शर्मा यांच्या खंडपीठासमोर केला. 

तिने तिचा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला, "ती म्हणते हा क्षण माझ्यासाठी संमिश्र आहे. मला स्वत:चा अभिमान वाटतो. मी स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं. मला असं वाटतं हा मार्ग मी आधीपासूनच निवडला होता. गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो पण असे क्षण आठवून देतात की आपण योग्य दिशेने जात आहोत." 

Web Title: achnal bhateja first blind women in supreme court of india to argue a case inspirational success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.