how to take care of touch screen phone? | खरकटे हात, चिकट पदार्थ, डब्यातलं सांडणारं तेल यानं तुमच्या टचस्क्रीन मोबाईलचं काय होतं?
खरकटे हात, चिकट पदार्थ, डब्यातलं सांडणारं तेल यानं तुमच्या टचस्क्रीन मोबाईलचं काय होतं?

ठळक मुद्दे टचस्क्रीन फोनची काळजी घेतली नाही, तर तो बिघडतोच.

-सखी ऑनलाइन टीम

हल्ली आपण सगळ्याच जणी टचस्क्रीनचे फोन वापरतो. स्वयंपाक करताना फोन सोबत असतो. कामात असताना उचलला जातो, मुलं तर कायम सतत आपल्या फोनशी खेळत असतात. ते फेकतात काय, त्यावर पाणी काय सांडतं, खरकटे हात काय लागतात. चिकट होतात फोन. आणि परिणाम म्हणून लवकर खराबही होतात. आणि स्क्रिन खराब होतो. अनेकींच्या फोनला स्क्रॅटेच गेलेले दिसतात. मग ते तडे गेलेले फोन लवकर खराबही होतात. आणि मग डोक्याला ताप होतो. तर आता प्रश्न असा की आपल्या कामाच्या धबडग्यात या फोनची काळजी कशी घ्यायची? त्यासाठीच हे काही सोपे उपाय.

1)  फोनकधीही नखानं ऑपरेट करु नखा. त्यानं ओरखडे जातात. बोटांनीच ऑपरेट करा. 


2) फोनला हलकासा स्पर्श केला तरी तो ऑपरेट होतो. दणादण बदडायची किंवा बोटं आपटायची गरज नसते. हलकासा नाजूक स्पर्श पुरतो. मात्र खूप जोरात प्रेस केला तर टचस्क्रीन खराब होतो.


3.  फोन तापतो तेव्हाही खराब होतो. त्यामुळे गॅस ओटय़ावर, गरम कुकर किंवा भांडय़ावर ठेवू नका. गाडीत प्रवास करतानाही ऊन लागेल असा फोन ठेवू नये.


4)हलक्या हातानं, मऊ कापडानं फोन पुसा. बर्‍याच जणी पाण्याचा हात लावून स्क्रिनवरचे डाग पुसतात तसं करू नये. 


5)  अनेकींना  मोबाईल पर्समध्ये मोकळाच ठेवायची सवय असते. काहीजणी तर सतत हातातच घेऊन फिरतात. पर्समध्ये अनेक वस्तू असतात. घराच्या चाव्या, पेन,  जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, सौंदर्यप्रसाधानं त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल मोबाईलसोबत फ्लीपकव्हर येतेच, ते वापरता येईल.


6) शक्यतो उत्तम प्रतीचा स्क्रीन गार्ड फोनला लावून घ्या. तेलकट, तुपकट हात, जेवताना फोन ऑपरेट करणं असं करु नका.

Web Title: how to take care of touch screen phone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.