how to get a best personality -try this | मैं अपनी फेवरिट हूं! - असं म्हणत बेस्ट व्यक्तिमत्व घडवायचंय तुम्हाला, हे घ्या काही उपाय.
मैं अपनी फेवरिट हूं! - असं म्हणत बेस्ट व्यक्तिमत्व घडवायचंय तुम्हाला, हे घ्या काही उपाय.

ठळक मुद्दे इतरांचं नाही तर आपलं व्यक्तिमत्व कसंय ते शोधा!

सखी ऑनलाइन टीम

कसली भारी पर्सनॅलिटी आहे ना तिची? नाहीतर आपण? आपल्याला नाही बाई जमत तिच्यासारखं रहायला असं बायका किती सहज म्हणतात. तुम्हाला कुणाचं व्यक्तिमत्व आवडतं असा प्रश्न कुणी विचारलाच तर  उत्तर हमखास दुसर्‍या कुणाचं येतं किंवा सेलिब्रिटींचं.पण मै अपनी फेवरिट हूं असं म्हणतो का आपण? मग आपण हे स्वतर्‍चं फेवरिट कसं बनता येईल?
 तसं पाहिलं तर  ‘पर्सनॅलिटी’ हा फार परवलीचा शब्द. अमूकची डॅशिंग आहे, तमूकची अ‍ॅट्राक्टिव्ह आहे, ढमूकची एकदम इम्प्रसिव्ह आहे अशी चर्चा सतत होते. आपणही आपल्याला आवडणार्‍या माणसांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गोष्टी कॉपी करण्याचा प्रय} करतो.  मात्र आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि मग अनेकदा कुणीतरी आपल्याविषयी काहीतरी बोलतो तेव्हा आपण म्हणतो की, अशी मी नाहीच. प्रत्यक्षात मात्र तसं असतं. 
आपण काय बोलतो, काय करतो, कुठल्या गोष्टींकडे आकर्षित होतो, या सर्व निर्णयांवर आपलं व्यक्तिमत्त्व आकार घ्यायला लागतं. काही गोष्टी जन्मतर्‍ मिळतात, मात्र व्यक्तिमत्व उत्तम घडवताही येऊ शकतं. अनेकदा बर्‍याचजणी आपल्या व्यक्तिमत्वाचा अगदी कायापालटही करतात.
त्यामुळे निदान आपण आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे ओळखून त्याप्रमाणे स्वतर्‍ला स्वीकारायला हवं. आणि त्याप्रमाणे आपल्या करिअरलाही आकार द्यायला हवा.


त्यासाठी हे काही साधेसरळ उपाय.

 

1.आत्मपरीक्षण करा. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हा प्रश्न आपणच स्वतर्‍ला विचारायला हवा. आपल्या मधले महत्त्वाचे गुण कोणते, याची यादी करा. तुम्ही शांत स्वभावाचे आहात की तापट, अबोल आहात की बडबडे, लोकांबरोबर पटकन मिसळता की ओळख व्हायला वेळ लागतो, विचारपूर्वक निर्णय घेता की जे सुचेल ते करुन मोकळे होता? हे असे प्रश्न स्वतर्‍ला, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना विचारा, स्वतर्‍ला समजून घ्या.

2. हल्ली भरपूर ऑनलाइन पर्सनॅलिटी टेस्ट उपलब्ध आहेत, त्याही मोफत त्याही करुन पहायला हरकत नाही. त्यातून  स्वतर्‍विषयी काही अंदाज  घेता येईल.  
3. आपला स्वभाव अमूक प्रकारचा आहे आणि अमूक आपल्या स्वभावात त्रुटी आहे हे लक्षात आलं की ते स्वीकारा.  
4. आपलं व्यक्तिमत्व असंच का आहे म्हणून भांडत बसू नका. कारण प्रत्येक प्रकारची पर्सनॅलिटी ही उत्तमच असते, आपण फक्त तिचा वापर करुन घ्यायला शिकलं पाहिजे.  जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं आपलं व्यक्तिमत्व उत्तम बनवाल आणि यशस्वी व्हाल!
 

Web Title: how to get a best personality -try this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.