Honey-milk-sugar for a happy and glowing face | प्रसन्न चेहेर्‍यासाठी मध-दूध-साखर

प्रसन्न चेहेर्‍यासाठी मध-दूध-साखर

- प्रतिनिधी

यंदा दिवाळी आणि हिवाळा हातात हात घालून आले आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी सौंदर्योपचार करताना थंडीचा, थंडीतल्या कोरड्या वातावरणाचाही विचार करावा लागेल. या दिवसात आपण आपल्या त्वचेला जर भरपूर पोषण  पुरवू शकलो तर त्वचेवर सणासुदीसाठीचं आवश्यक तेज आणि प्रसन्नता येईल. या प्रसन्न त्वचेसाठी स्वयंपाकघरातल्या फक्त तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१) मध

एक चमचा मध घेऊन हलक्या हातानं चेहऱ्याला मसाज करा. दहा मिनिटांनी चेहरा आधी पुसून काढावा आणि नंतर थंड पाण्यानं धुवावा. मध त्वचेचा पोत सुधारायला मदत करते.

२) दूध

दिवसातून दोन वेळा कापसाचा बोळा घेऊन चेहरा दुधानं पुसून काढावा किंवा एक छोटी वाटी गार दूध घेऊन ते चेहऱ्याला लावावं. ते तसंच कोरडं होऊ द्यावं. आणि नंतर ओल्या मऊ रुमालानं चेहरा हलक्या हातानं पुसावा. दुधात मीठ घालूनही ते मिश्रण चेहऱ्याला लावणं उत्तम.

३) साखर

साखरेमुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते. साखरेचा उपयोग त्वचेसाठी करतान ती दह्यात किंवा सायीत घालून ती सायसाखर चेहऱ्याला लावली तर त्वचेचा पोत सुधारतो. दहा मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवावा. साखरेच्या खरबरीतपणामुळे त्वचा स्वच्छ होते आणि तजेलदार दिसते.

Web Title: Honey-milk-sugar for a happy and glowing face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.