Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health > शरीरातील युरीक अॅसिडची पातळी सुरळीत राहण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

शरीरातील युरीक अॅसिडची पातळी सुरळीत राहण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

What to do to keep uric acid levels in the body stable? Know the symptoms and remedies : शरीरातील युरीक अॅसिडची पातळी योग्य राहावी यासाठी काय करायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 10:04 IST2025-11-21T10:04:08+5:302025-11-21T10:04:53+5:30

What to do to keep uric acid levels in the body stable? Know the symptoms and remedies : शरीरातील युरीक अॅसिडची पातळी योग्य राहावी यासाठी काय करायला हवे.

What to do to keep uric acid levels in the body stable? Know the symptoms and remedies | शरीरातील युरीक अॅसिडची पातळी सुरळीत राहण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

शरीरातील युरीक अॅसिडची पातळी सुरळीत राहण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

शरीरातील युरिक अॅसिड वाढणे ही आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे. रक्तातील ही पातळी जास्त झाली की सांधे दुखणे, सूज येणे, चालताना त्रास होणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात. (What to do to keep uric acid levels in the body stable? Know the symptoms and remedies)काहीवेळा तर सकाळी उठल्यावर बोटे कडक झाल्यासारखी वाटतात किंवा पायाच्या अंगठ्याजवळ तीव्र वेदना जाणवतात. ही सर्व लक्षणे युरिक अॅसिड वाढल्याचे संकेत आहेत.

युरिक अॅसिड मुख्यतः शरीरातील पुरिन या पदार्थाच्या विघटनातून तयार होते. पण जेव्हा आहारात पुरिन जास्त असतो, पाणी कमी प्यायले जाते किंवा शरीराची पचनाची प्रक्रिया नीट काम करत नाही, तेव्हा हे अॅसिड बाहेर न पडता रक्तात साचू लागते. जास्त प्रमाणात जास्त तेलकट पदार्थ, साखरयुक्त पेये, मद्यपान, जंक फूड, तसेच दीर्घकाळ बसून राहणे ही सर्व महत्त्वाची कारणे आहेत. काहीवेळा स्थूलता, थायरॉईडचा त्रास किंवा किडनीची कार्यक्षमता कमी असणे ही कारणे असतात.

युरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे पाण्याचे सेवन वाढवणे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर पडतात आणि सांध्यांवरील ताण कमी होतो. आहार हलका, कमी तेलकट आणि नैसर्गिक ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. डाळी, फळे, भाज्या, सॅलेड यांचा समावेश वाढवावा. साखरेचे पेये, बेकरी पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्य टाळण्याचा प्रयत्न करावा. कडधान्य कमी प्रमाणात घ्यावीत आणि लाल मांस किंवा अवयवातील मांस पूर्णपणे टाळावे.

नियमित चालणे, हलका व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणेही युरिक अॅसिडची पातळी संतुलित ठेवण्यात मदत करते. ताण कमी ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि दिवसात थोडा आराम घेणे हेही तितकेच उपयुक्त ठरते. एकूणच, युरिक अॅसिड वाढण्यापूर्वीच योग्य आहार, पाणी आणि जीवनशैली सुधारली की हा त्रास सहज टाळता येतो. शरीर हलके, सांधे बरे आणि दैनंदिन कामे सुरळीत राहण्यासाठी ही काळजी आवश्यकच आहे.

Web Title : यूरिक एसिड नियंत्रण: स्वस्थ जीवन के लिए लक्षण और उपाय जानें।

Web Summary : उच्च यूरिक एसिड जोड़ों में दर्द का कारण बनता है। पानी पिएं, स्वस्थ आहार बनाए रखें और नियमित रूप से व्यायाम करें। तनाव कम करें और स्तरों को प्रभावी ढंग से प्रबंधित करने के लिए पर्याप्त नींद लें।

Web Title : Control uric acid: Symptoms, remedies for healthy living explained.

Web Summary : High uric acid causes joint pain. Drink water, maintain a healthy diet, and exercise regularly. Reduce stress and get enough sleep to manage levels effectively.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.