Lokmat Sakhi >Health >Pregnancy > लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय?

लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय?

World Breastfeeding Week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग ३: बाळ झाल्याचं सुख मोठंच पण तरी आईला होऊच शकतो पोस्ट पार्टम डिप्रेशनचा त्रास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2025 08:05 IST2025-08-03T08:00:00+5:302025-08-03T08:05:02+5:30

World Breastfeeding Week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग ३: बाळ झाल्याचं सुख मोठंच पण तरी आईला होऊच शकतो पोस्ट पार्टम डिप्रेशनचा त्रास.

World Breastfeeding Week 2025 : postpartum depression, how to deal with it? | लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय?

लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय?

- ओजस सु.वि. (स्तनपान सल्लागार)

प्रसूतीनंतरचा काळ नवीन आईसाठी मानसिक आणि शारीरिक बदलांचा असतो. शरीरात हॉर्मोन्सची उलथापालथ झालेली असते, चालू असते. तसेच सुरुवातीचे काही महिने (World Breastfeeding Week 2025) बाळ छोटी छोटी झोप घेते. अशावेळी आईची झोप रात्री पूर्ण होत नाही.  प्रसूतीनंतर सुरुवातीचे काही आठवडे इस्पितळात किंवा घरी भेटायला येणाऱ्या सततच्या पाहुण्यांमुळे आईची विश्रांती होत नाही. तसेच तिला अनेकदा अनाहूत परस्पर विरोधी सल्ले मिळत राहतात. त्याचा तिच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो(postpartum depression, how to deal with it?).

अनेकदा आईची मानसिक चिडचिड होते. आईला सारखे रडू येते. कदाचित ते प्रसूती नंतर येणारे नैराश्य (पोस्ट पार्टमडिप्रेशन) ही मानसिक स्थिती असू शकते. अशावेळी या स्थितीकडे दुर्लक्ष न करता मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आईच्या मानसिक स्वास्थ्यावर, परिणामत: शरीरावर आणि आई- बाळाच्या नात्यावर होऊ शकतो. कधीकधी दूध कमी येण्याचे कारण मानसिक ताण हे ही असू शकते. बाळाचे संगोपन आणि स्तनपान आईसाठी प्रामुख्याने आनंददायी असायला हवे. तरीही कधीतरी थोडे रडू येणे, कंटाळा येणे, चिडचिड होणे स्वाभाविक आहे. हा हार्मोन मधील बदलांचा परिणाम असू शकतो.

आईचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी..

१. पुरेशी झोप घ्या. रात्री बाळ जागणारच आहे. दिवसा बाळ झोपले की आईनेही झोपावे. 
सकस, ताजे, आवडीचे, घरी शिजवलेले अन्न खावे. ताजी हंगामी फळे, सॅलेड खावे. भरपूर पाणी प्यावे. 
२. डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम, थोडे चालणे सुरू करावे.  
दिवसभरातील २० मिनिटे स्वत:साठी ठेवावीत. पोटभर स्तनपान देऊन बाळाला जबाबदार व्यक्तीकडे सोपवून आपल्या विरंगुळ्याचे कोणतेही काम करावे. उदा.- वाचन, कोडे/ सुडोकू सोडवणे, संगीत, हलके नृत्य, बागकाम, मेडिटेशन, इ.
३. 'मातृत्व' ही आपली जीवनातील एक भूमिका आहे. त्याखेरीज आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, याची स्वत:ला आठवण करून द्या. 

४. खूप आगंतुक सल्ले देणारी, मनात सेल्फ डाऊट निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून स्वत:ला दूर ठेवा. 
५. स्तनपानाबाबत काही प्रश्न पडले असे प्रश्न सर्टिफाईड स्तनपान सल्लागारांना किंवा समुपदेशकांना विचारावेत. सोशल मीडियावर अवलंबून राहू नये.
६. मातृत्व रजेमुळे आपले कार्यक्षेत्र सुटले असेल तरी त्याचा ताण न घेता आपण काम सुरू केल्यावर पुन्हा कामाची गाडी रुळावर येईल, हे स्वत:ला आश्वस्त करा. मनापासून इच्छा असल्यास थोडे थोडे हलके काम सुरू करा, परंतु त्याचा ताण घेऊ नका. 
७. आपल्या भावनांशी प्रामाणिक रहा. निराशा, संताप, थकवा, कंटाळा, नकोसे वाटत असेल तर निसंकोचपणे समुपदेशकाची भेट घ्या.

https://www.instagram.com/themilkyway_ojas/
http://linktr.ee/ojas.sv.lc

contact: 94035 79416

Web Title: World Breastfeeding Week 2025 : postpartum depression, how to deal with it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.