ओजस सु.वि. (स्तनपान सल्लागार)
आपलं बाळ हसरं, निरोगी आणि हुशार व्हावं हे सगळ्या आईबाबांना वाटतं. बाळाचं आरोग्य हा सगळ्याच परिवाराच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बाळांच्या आरोग्यासाठी मल्टीबिलियन डॉलर इंडस्ट्री गेल्या दीडशे वर्षांपासून काम करत आहेत. (Breastfeeding Week 2025) मी आज तुम्हाला अशा एक प्रोडक्टबद्दल सांगणार आहे ‘जे तुमच्या बाळाच्या अतिशय कोवळ्या पचनसंस्थेला पौष्टिक आणि चविष्ट अन्न देतं. (World Breastfeeding Week) प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक्स देतं. मित्रजीवाणू देतं. रोगप्रतिकारक शक्ती देतं. अगदी बाळाच्या मागणीनुसार नेहमी ताज्या आणि योग्य तेवढ्याच पोषणाचा पुरवठा करतं. कायम ‘रेडी टू इट’ असतं! (Importance of breastfeeding) त्यामध्ये बाळाच्या वयानुसार, ऋतुमानानुसार, वयानुरूप गरजेनुसार कार्ब्स, प्रथिनं, फॅट्स, जीवनसत्त्व, आणि पाणी यांचं 'बेस्ट पॅकेज’ असतं. हे जादुई रसायन आहे, आईचं दूध! (Breastfeeding tips for new moms)
आईचं दूध हे केवळ अन्न नाही तर अनेक रोगजंतूंपासून बचाव करणारी लस आहे. आई आणि बाळ ज्या वातावरणात असतील त्याठिकाणी असणाऱ्या रोगजंतुंविरोधी ॲण्टीबॉडीजही आईच्या शरीरात तयार होतात आणि ती प्रतिजैविके दुधातून बाळाच्या पोटात जातात. बाळाला संरक्षक कवच मिळतं.
बाळ आजारी असेल तर औषधी ठरणारे ‘दाहविरोधक’ (anti -inflammatory) दुधात तयार होतात. त्यामुळे आजारी बाळ पुनःपुन्ह आईकडे दूध मागतं. दूध पिऊन त्याला आराम पडतो. बाळाला खेळताना लागलं, दुखापत झाली तेव्हा आईने बाळाला स्तनपान दिले तर बाळाची वेदना कमी होते. लसीकरणाच्या वेळीही इंजेक्शन देताना बाळ रडत असेल तर स्तनपान ही मात्र लागू होते.
बाळ जसजसं मोठं होतं तसं आईचं दूधही ‘मोठं’ होतं. पहिल्या दिवसात आईला येणारे चिकदूध त्या वयाच्या बाळाच्या वाढीच्या सर्व गरजा पुरवतं. प्रीटर्म बाळांच्या आईचं दूधही त्यांच्या मेंदूविकासास आणि वाढीस अनुरूप असतं. सुरुवातीच्या दिवसात आईचे चिकदूध हेच खरेतर बाळासाठी ‘सुवर्ण प्राशन’ आहे! चिकदूध बाळांसाठी अत्यंत गरजेचे असते.
मूल मोठं झाल्यावर त्याच्या बदलत्या गरजांनुसार दुधाचे घटक बदलतात. एक वर्षानंतर बाळ बाहेरचे अन्न खात असेल तरी काही जीवनसत्त्वे आणि रोग प्रतिकारशक्ती देणारे घटक आईच्या दुधातून मिळतात. आईच्या दुधात taurine हे द्रव्य असते जे मेंदू विकासासाठी महत्वाचे असते.
आयुष्याचे किमान पहिले सहा महिने बाळ केवळ आईच्याच दुधावर वाढतं. दोन वर्ष वयाचं होईपर्यंत बाळाला लागणारी रोगप्रतिकार शक्ती आईच्या दुधातून मिळते. बाळाला पहिले किमान सहा महिने आईचे दूधच पाजावे आणि किमान दोन वर्षापर्यंत स्तनपान दिले जावे- असा सल्ला जागतिक आरोग्य संघटना देते.
वयाच्या दोन वर्षाहून जास्त काळ आईचं दूध प्यायलेल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता विकास अधिक दिसून येतो.
आहे की नाही खरोखर ‘जादुई रसायन’? आणि ते ही संपूर्ण मोफत!!
https://www.instagram.com/themilkyway_ojas/
http://linktr.ee/ojas.sv.lc
contact: 94035 79416