दीपिका पादुकोण. दुसऱ्यांदा आई होणार आहे, तसे तिनेच समाजमाध्यमात जाहीर केले. पहिली लेक अजून लहान आहे आणि दुसरं बाळ येण्याची आनंदवार्ता आहे. आणि याचदरम्यान अजून एका चर्चेनं जोर धरला. एकतर पहिलं बाळ जरा मोठं झाल्यावर दीपिकाने काम सुरू केलं आणि स्पष्ट सांगितलं की, बाळ लहान असल्याने मी आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणार नाही. त्यावरून बरीच चर्चा झाली. मुळात कुणा महिलेनं कामाच्या संदर्भात अशा अटी, शर्ती ठेवून काम करणं हेच आपल्याकडे नवीन, म्हणजे महिलांना काम देतो हेच उपकार अशी एक छुपी पुरुषी मानसिकता सर्वत्र दिसते.
तर तो वाद अजून सुरूच असताना दुसरी चर्चा. दीपिका गरोदर असताना काही सिनेमांचे शूटिंग करते आहे, तर समाजमाध्यमात चर्चा हीच की, एवढा पैसा असताना कशाला काम करायचं? मुळात म्हणजे नवरा इतका प्रचंड पैसा कमवत असताना बायकोनं घरी बसावं असं सांगणारी ही चर्चा. गरोदरपण हा आजार नाही, तब्येत चांगली असेल तर गरोदरमाता काम करू शकते हे डॉक्टरही सांगतात. मात्र, नव्या समाजमाध्यमी चर्चेत गरोदरमातेनं नोकरी करणं, काम करणं हे आरोग्याला बरं नाही असा एक सूर दिसतो.
अर्थात अनेक महिला अगदी नवव्या महिन्यापर्यंत काम करतात, काहींना आर्थिक निकड असते तर काहींसाठी काम आणि करिअर हे पैशाइतकंच महत्त्वाचं असतं. गरज असते ती खरंतर गरोदरमातांना आवश्यक असलेल्या सुविधांची. प्रवासाची चांगली सोय, कार्यालयात कामाचे फ्लेक्झी अवर्स, जेवण गरम करुन खाणं गरजेचं असेल तर तशी सोय. पण आपल्याकडे महिलांनी सोयी मागणे हाच गुन्हा समजला जातो.
मात्र तरी काहीजणी बोलतात. आपलं गरोदरपण न लपवता, तब्येत साथ देते आहे तोपर्यंत काम करण्याचा पर्याय आता सेलिब्रिटी असलेल्या महिलाही स्वीकारत आहेत हा बदल महत्त्वाचा आहे.
दीपिका पादुकोण त्या बदलाचा एक चेहरा आहे इतकंच.
Web Summary : Deepika Padukone faces criticism for working during her pregnancy, sparking debate about societal expectations. While some prioritize financial needs or career fulfillment, others question her decision, highlighting the challenges pregnant women face in balancing work and health.
Web Summary : दीपिका पादुकोण को गर्भावस्था के दौरान काम करने के लिए आलोचना का सामना करना पड़ा, जिससे सामाजिक अपेक्षाओं पर बहस छिड़ गई। कुछ लोग वित्तीय जरूरतों या करियर की पूर्ति को प्राथमिकता देते हैं, वहीं अन्य उनके फैसले पर सवाल उठाते हैं, जिससे गर्भवती महिलाओं को काम और स्वास्थ्य को संतुलित करने में आने वाली चुनौतियों पर प्रकाश पड़ता है।