बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर टप्प्यातून जात आहे. लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणार असून तिच्या प्रेग्नेंसीची सर्वत्र चर्चा आहे. परंतु, नुकतेच, तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या पोटावर एक सरळ उभी काळी रेषा दिसत आहे. ही रेषा पाहून अनेकींच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. गरोदरपणात पोटावर ही रेषा का येते? ती येणे सामान्य आहे का? आणि बाळंतपणानंतर ती गायब होते का? असे अनेक प्रश्न पडतात(what is linea nigra in pregnancy).
प्रेग्नन्सी दरम्यान तिच्या पोटावर दिसणारी एक सरळ उभी गडद रेषा पाहून अनेकींच्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहिले असतील. अनेक गर्भवती महिलांच्या पोटावर अशी रेषा दिसते, मात्र यामागचं ( why linea nigra appears during pregnancy) नेमकं कारण काय असतं, ही रेषा का येते आणि ती आरोग्यासाठी धोकादायक आहे का, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. प्रेग्नंन्सीत पोटावर दिसणारी ही रेषा म्हणजे नेमकं काय, ती का दिसते आणि (sonam kapoor shows baby bump) प्रेग्नन्सीनंतर तिचं काय होतं ते पाहूयात.
'लिनिया नाइग्रा' (Linea Nigra) म्हणजे काय?
लिनिया नाइग्रा (Linea Nigra) ही पोटावर दिसणारी एक सरळ उभी गडद रेषा असते. ही रेषा साधारणपणे नाभीपासून पोटाच्या खालच्या भागापर्यंत किंवा काहीवेळा छातीपर्यंत दिसू शकते. 'लिनिया' (Linea) म्हणजे रेषा आणि 'नाइग्रा' (Nigra) म्हणजे काळी/गडद. खरंतर, ही रेषा प्रत्येक स्त्रीच्या पोटावर जन्मापासून असतेच, जिला 'लिनिया अल्बा' (Linea Alba) असे म्हणतात. ती रंगाने पांढरी किंवा त्वचेच्या रंगाची असल्याने एरवी दिसत नाही. पण प्रेग्नन्सीमध्ये मेलानिन वाढल्यामुळे ती गडद होऊन स्पष्ट दिसू लागते. गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समधील बदलांमुळे ती गडद होते आणि स्पष्ट दिसू लागते.
तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!
रोजच जागरण म्हणजे मरण जवळ येणंच! फार काम म्हणून रात्रीचा दिवस कराल तर आयुष्य होते कमी कारण...
लिनिया नाइग्रा ही रेषा का येते?
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी वेगाने वाढते. या बदलामुळे शरीरातील मेलानोसाईट (Melanocyte) पेशी अधिक सक्रिय होतात. या पेशी 'मेलानिन' नावाचे रंगद्रव्य तयार करतात, ज्यामुळे त्वचेचा काही भाग गडद होतो. या प्रक्रियेला 'हायपरपिग्मेंटेशन' म्हणतात आणि याच कारणामुळे पोटावर ही उभी रेषा गडद दिसते. गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांपैकी हा एक अतिशय सामान्य बदल आहे.
ही रेषा कधी दिसते?
साधारणपणे गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत (Second Trimester), म्हणजेच चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात ही रेषा गडद व्हायला सुरुवात होते. जसजसे पोट वाढत जाते, तसतशी ही रेषा अधिक स्पष्ट होत जाते.
प्रत्येक गर्भवती महिलेला लिनिया नाइग्रा ही रेषा येते का?
प्रत्येक गर्भवती महिलेला लिनिया नाइग्रा ही रेषा येतेच असे नाही. काही महिलांमध्ये ही रेषा ठळकपणे दिसते, काहींमध्ये फारच फिकट असते. तर काही महिलांमध्ये अजिबातच दिसत नाही. त्वचेचा रंग, हार्मोन्स, जनुकीय घटक आणि शरीराची रचना यावर हे अवलंबून असते. गर्भधारणेदरम्यान शरीरात एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. या हार्मोन्समुळे त्वचेत असलेल्या मेलानिन पिगमेंटचे उत्पादन वाढते. याच मेलानिनमुळे पोटावरील रेषा गडद होते. निपल्स, मान, काख किंवा जांघेचा रंगही थोडा काळवंडतो, म्हणूनच ही रेषा कोणत्याही आजारामुळे नसून नैसर्गिक हार्मोनल बदलांमुळे दिसते.
बाळंतपणानंतर काय होते?
लिनिया नाइग्रा ही कायमस्वरूपी नसते. बाळंतपणानंतर शरीरातील हार्मोन्सची पातळी पुन्हा नॉर्मल होते, तसतशी ही रेषा हळूहळू फिकट होत जाते आणि काही महिन्यांत पूर्णपणे दिसेनाशी होते. डिलिव्हरीनंतर हळूहळू हार्मोन्सचे संतुलन पूर्ववत होते आणि २ ते ६ महिन्यांत ही रेषा फिकी पडते. काही महिलांमध्ये ती पूर्णपणे नाहीशी होते तर काहींमध्ये थोडीशी फिकट राहू शकते.
लिनिया नाइग्रा आरोग्यासाठी धोकादायक आहे का?
लिनिया नाइग्रा आरोग्यासाठी अजिबात धोकादायक नाही. लिनिया नाइग्रा ही रेषा येणं म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीचं किंवा बाळाच्या आरोग्यासाठी धोक्याचं लक्षण नाही. त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नसते.
