lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > वॉटर बर्थ म्हणजे काय ? पाण्यात डिलिव्हरी करणं सुरक्षित असतं की धोक्याचं ?

वॉटर बर्थ म्हणजे काय ? पाण्यात डिलिव्हरी करणं सुरक्षित असतं की धोक्याचं ?

What is water birth ? Everything you need to know : प्रसूती म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात इतक्या त्या वेदना अवघड असतात, वॉटर बर्थ या नव्या पद्धतीनुसार ही प्रसूती सोपी होते का?

By प्रियांका निर्गुण. | Published: July 8, 2023 05:16 PM2023-07-08T17:16:13+5:302023-07-12T08:52:54+5:30

What is water birth ? Everything you need to know : प्रसूती म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात इतक्या त्या वेदना अवघड असतात, वॉटर बर्थ या नव्या पद्धतीनुसार ही प्रसूती सोपी होते का?

Want to know about water birth ? Here are all the benefits & risks of this natural painless delivery method. | वॉटर बर्थ म्हणजे काय ? पाण्यात डिलिव्हरी करणं सुरक्षित असतं की धोक्याचं ?

वॉटर बर्थ म्हणजे काय ? पाण्यात डिलिव्हरी करणं सुरक्षित असतं की धोक्याचं ?

प्रियांका निर्गुण - जाधव. 

आई होणं हा एक विलक्षण अनुभव असतो. जगणं बदलून टाकणारा. ९ महिन्याचं गरोदरपण देखील कधी सुखावतं कधी दुखण्याखुपण्यानं त्रास देतं. त्यात एक टेंशन असतंच की डिलिव्हरी नॉर्मल होणार की सिझेरियन? अनेकजणी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून भरपूर काळजी घेतात. मात्र ते सारं गरोदरमातेच्या हातात नसतं. डॉक्टर आवश्यक तो योग्य निर्णय घेऊन डिलिव्हरी करतात. मात्र या दोन्ही पलिकडे आता प्रसूतीच्या काही नवीन पद्धतीदेखील आता चर्चेत आहेत. त्यापैकीच एक वॉटर बर्थ(Want to know about water birth ? Here are all the benefits & risks of this natural painless delivery method).

वॉटर बर्थ म्हणजे नेमके काय?

वॉटर बर्थ हा बाळाला जन्म देण्याचा एक प्रकार आहे. जसे सिजेरियन किंवा नॉर्मल डिलिव्हरी असे प्रकार असतात तसाच. वॉटर बर्थ हा नॉर्मल डिलिव्हरीचाच एक आधुनिक प्रकार आहे. पाण्यात डिलिव्हरी केली जाते. या पद्धतीमध्ये प्रसूती कळा कमी होतात, आणि बाळाला जन्म देताना आईला कमी त्रास होतो. गरम पाण्यात असल्यामुळे महिलेच्या शरीरामध्ये एंड्रोफिन हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतात. ज्यामुळे वेदना कमी होतात. 

‘आधी होती माझी फिगर हॉट, पण आई झाल्यानंतर.. ’ -बिपाश बासू सांगते, मम्मा डोण्ट कॉलॅप्स...

१. गर्भवती महिलेला जेव्हा लेबर पेन सुरू होते तेव्हा तिला पाण्याने भरलेल्या एका मोठ्या टबमध्ये बसविण्यात येते.
२. या दरम्यान टबमध्ये पाणी भरण्यात येते जे कोमट असते. यामुळे महिलेच्या शरीरातून लेबर पेनदरम्यान येणारे क्रॅम्प्स कमी होतात. कारण शरीरातील स्किन सेल्स आणि टिश्यूज सॉफ्ट होतात.

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

वॉटर बर्थ योग्य की अयोग्य?

बाळाचा जन्म अशा पद्धतीने करण्यासाठी कितीही मोठा टब वा कितीही पाणी असे असून चालत नाही. यासाठी काही योग्य प्रमाण आणि पद्धती आखून दिलेल्या असतात. वॉटर बर्थसाठी एक पूल तयार करण्यात येतो, जो २.५ ते ३ फूट लांब असतो आणि त्यामध्ये साधारणतः ३०० ते ४०० लीटर पाणी असते. गर्भवती महिलेच्या शरीराच्या अंदाजाने हा पूल तयार केला जातो. गर्भवती महिलेच्या शरीराला आराम मिळावा इतक्याच तापमानाचे पाणी पुलामध्ये ठेवण्यात येते. याचबरोबर बाळाची डिलिव्हरी होईपर्यंत या पाण्याचे तापमान समान असणे आवश्यक असते. जेव्हा लेबर पेन सुरू होते हे लेबर पेन वाढण्याच्या आधीच ३-४ तास महिलांना पाण्यात बसवले जाते. ही प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखालीच करण्यात येते.

गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

१. वॉटर बर्थ  दरम्यान पाण्यात राहिल्याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. तसेच यादरम्यान बऱ्याच महिलांचे ब्लड प्रेशर वाढते, ते देखील नियंत्रणात राहाते.
२. बाळ जेव्हा गर्भाच्या बाहेर येते तेव्हा पाण्याचे तापमान योग्य असल्याने अजूनही गर्भातच असल्याचा भास देखील बाळाला होतो.
३. या पद्धतीमध्ये आई आणि बाळाला इंफेक्शन होण्याची भीती ८० % कमी होते. तसेच पाण्यात राहिल्याने महिलांना तणाव आणि भीतीही वाटत नाही. ही डिलीव्हरी पद्धत तुलनेनं महाग आहे.

Web Title: Want to know about water birth ? Here are all the benefits & risks of this natural painless delivery method.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.