Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

Deepika Padukone's Stunning Look: एका सिनेमाच्या सेटवरचे दीपिका पदुकोनचे फोटो व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 05:43 PM2024-04-17T17:43:53+5:302024-04-17T18:07:19+5:30

Deepika Padukone's Stunning Look: एका सिनेमाच्या सेटवरचे दीपिका पदुकोनचे फोटो व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली.

Mommy to be Deepika Padukone's police officer dressing for the shooting of singham again stunned internet | गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

Highlightsशुटिंग दरम्यानचे काही फाेटो तिचे सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि त्यामधला दीपिकाचा एकंदरीत गेटअप आणि देहबोली पाहून ती खरोखरच प्रेग्नंट आहे ना, असा प्रश्न काही जणांनी तिला विचारला.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन (Deepika Padukon) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांनी काही महिन्यांपुर्वीच ते दोघेही आई- बाबा होणार असल्याची माहिती सोशल मिडियावर दिली होती. तेव्हापासून दीपिकाकडे तिच्या चाहत्यांचे अधिक बारकाईने लक्ष आहे. मुळात ती गरोदर आहे म्हणजे तिने आता एका विशिष्ट पद्धतीने राहायला, वागायला पाहिजे अशी एक कल्पना तिच्या चाहत्यांच्या डोक्यात पक्की बसलेली आहे आणि ते त्याच दृष्टीकोनातून तिच्याकडे पाहात आहेत. म्हणूनच तर 'सिंघम अगेन'च्या (Singham Again) शुटिंग दरम्यानचे काही फाेटो तिचे सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि त्यामधला दीपिकाचा एकंदरीत गेटअप आणि देहबोली पाहून ती खरोखरच प्रेग्नंट आहे ना, असा प्रश्न काही जणांनी तिला विचारला. (Deepika Padukon pregnancy)

 

'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका शक्ती शेट्टी या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करते आहे. त्यामुळे शुटिंगदरम्यान ती पोलीस अधिकाऱ्याच्याच वेशभुषेत असून ती त्यामध्ये खूपच डॅशिंग दिसते आहे. ती एवढं धाडसाने काम करते आहे, शिवाय तिचं पोटही दिसत नाही, असं का? असा प्रश्न तिला काही जणांनी विचारला आहे.

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, ॲक्ने होतील छुमंतर, बघा भाग्यश्री सांगतेय तरुण त्वचेसाठी ब्यूटी सिक्रेट

तर काही जण मात्र गरोदरपणातही ती ज्या उत्साहाने काम करते आहे त्याचं जबरदस्त कौतूक करत आहेत.  काही जण दीपिका आणि रणवीर यांनी बाळासाठी सरोगसीचा पर्याय निवडला असावा, असाही अंदाज लावत आहेत. 

 

गरोदर असलं की अमूक करा, तमूक करणं टाळा अशा अनेक संकल्पना आता मागे पडत चालल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने गरोदरपणातले ९ महिने अनेक जणी त्यांची नोकरी, व्यवसाय अशी कामं पुर्वी करायच्या तेवढ्याच ताकदीने करत आहेत.

उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा

कारण गरोदरपण आणि आजारपण यात खूप मोठा फरक आहे हे आज बहुतांश महिलांनी समजून घेतलं आहे. आलिया भट, यामी गौतम या अभिनेत्रींनीही त्यांच्या गरोदरपणात काम केलंच आहे. दीपिकाही त्यापैकीच एक. आता राहिला प्रश्न तिच्या पोट दिसण्याचा तर साधारण पाचव्या महिन्यात किंवा त्यानंतर पोट दिसायला सुरुवात होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची काळजी असणं ठीक आहे, पण तिचं ते रुप पाहून थेट तिच्या गरोदरपणावरच प्रश्नचिन्ह लावणं आणि वाट्टेल त्या कमेण्ट करणंही अजिबात योग्य नाही.

Web Title: Mommy to be Deepika Padukone's police officer dressing for the shooting of singham again stunned internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.