प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील प्रेग्नन्सीचा अनुभव हा वेगवेगळा असतो. प्रेग्नन्सी दरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरातील हार्मोन्सच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलांचे परिणाम त्या स्त्रीच्या चेहरा,आरोग्य, आणि शरीरावर देखील दिसतात. प्रेग्नन्सी दरम्यान बहुतांश महिलांची अशी तक्रार असते की, चेहऱ्यावर काळे डाग दिसतात, थकवा जाणवतो आणि त्वचेचा पोत देखील बदलतो. असे असले तरी बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advanis Pregnancy Diet Behind Her Radiant Glow) मात्र या काळातही तिच्या नैसर्गिक ग्लो आणि फ्रेश लुकसाठी चर्चेत आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्स आणि कार्यक्रमांमध्ये ती जशी दिसते, ते पाहून अनेकजणींना प्रश्न पडतो की, प्रेग्नन्सीत देखील कियाराची त्वचा इतकी तजेलदार कशी? तर याचं उत्तर लपलं आहे तिच्या आहारात!(Kiara Advani shares a sneak peek into her pregnancy diet behind her radiant glow).
कियाराचा (Kiara Advani) डाएट प्लॅन केवळ तंदुरुस्तीचसाठी नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठी खास डिझाइन केला आहे. या डाएट प्लॅनमुळे कियारा अडवाणी प्रेग्नन्सीतसुद्धा अगदी ताजीतवानी आणि फ्रेश दिसते. प्रेग्नन्सीमधील थकवा, हार्मोनल बदल, आणि त्वचेवर होणारे परिणाम हे कॉमन आहेत. पण कियारा अडवाणीकडे पाहिलं की असं वाटतं तिला हे नियम लागू पडत नसणार. प्रेग्नन्सीमध्ये ग्लो येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते, पण कियारासारखा परफेक्ट ग्लो मिळवण्यासाठी (Kiara Advani's pregnancy diet revealed) तिने स्वतःला काही खास सवयी लावून घेतल्या आहेत, ज्यामुळे ती प्रेग्नंन्सी दरम्यान देखील इतकी सुंदर दिसते. यासाठी, कियारा नेमकं काय करते ते पाहूयात.
प्रेग्नन्सीमध्ये नैसर्गिक ग्लो येतो, पण तो टिकवण्यासाठी आहार महत्त्वाचा...
प्रेग्नंन्सीदरम्यान महिलांच्या हार्मोन्समध्ये खूप मोठे बदल होतात, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते. मात्र, हा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. जर आपण प्रेग्नंन्सी दरम्यान कियारा अडवाणीप्रमाणेच आहारात ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स आणि भरपूर पाणी यांचा समावेश केला, तर तुमच्याही चेहऱ्यावर तितकीच तजेलदार झळाळी दिसू शकते.
सकाळी रिकाम्या पोटी शिल्पा शेट्टी पिते 'हे' खास ड्रिंक, म्हणून चाळिशी उलटली तरी आहे फिट!
कियारा डाएटमध्ये नेमकं काय काय खाते ?
कियारा अडवाणीच्या प्रेग्नन्सी डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की मूगडाळ, पनीर आणि अंड्याचा पांढरा भाग यांचा समावेश फार मोठ्या प्रमाणात असतो. याचसोबत, हायड्रेशनसाठी ती नारळपाणी, लिंबूपाणी आणि फळांनीयुक्त असे इंफ्यूज्ड वॉटर नियमितपणे पिते. नाश्त्यात ती ओट्स आणि ताजी फळं खाण्याला प्राधान्य देते, दुपारच्या जेवणात ती नेहमी हलके आणि संतुलित अन्नपदार्थ खाण्यावर अधिक भर देते. रात्रीच्या जेवणात पचायला सोपं खाणं तिच्या डाएटचा मुख्य भाग असतो.
व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...
संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...
काय खाणे टाळावे ?
प्रेग्नंन्सी दरम्यानच्या काळात शरीर अधिक संवेदनशील असतं, त्यामुळे प्रोसेस्ड फूड्स, अधिक मीठ किंवा साखर, कॅफिन, आणि तळलेले पदार्थ यांपासून शक्य तितकं दूर राहणं आवश्यक आहे. अशा पदार्थांमुळे केवळ पचनावर वाईट परिणाम होतो असं नाही, तर त्वचेवरही मुरुमं, खाज येणे किंवा रॅशेस यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कियारा देखील अशा अन्नपदार्थांपासून दूर राहते आणि त्याऐवजी हेल्दी स्नॅक्स खाणं पसंत करते.
प्रेग्नन्सीदरम्यान नैसर्गिक ग्लो आणणारे सुपरफूड्स कोणते ?
गर्भधारणेच्या काळात त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी काही सुपरफूड्स अत्यंत फायदेशीर ठरतात. अवोकाडो, अक्रोड, चिया सीड्स, बीटरूट आणि सिट्रस फळं जसे की संत्री, मोसंबी इ. आंबट चवींची फळं. हे सर्व पदार्थ व्हिटॅमिन ई , व्हिटॅमिन सी आणि ओमेगा- ३ फॅटी ॲसिड्स ने भरलेले असतात, जे त्वचेला मॉइश्चराइज करतात आणि त्वचेत नैसर्गिक तजेला निर्माण करतात. कियारा देखील हे सुपरफूड्स रोजच्या आहारात समाविष्ट करते.
हायड्रेशन देखील तितकेच महत्वाचे...
प्रेग्नंन्सी दरम्यान शरीरात डिहायड्रेशन होणं ही एक सामान्य समस्या आहे, जी थकवा, डोकेदुखी आणि त्वचेच्या कोरडेपणाचं प्रमुख कारण ठरू शकते. कियारा अडवाणी ह्या गोष्टीचं भान ठेवून दिवसभरात अनेक वेळा नारळपाणी, लिंबूपाणी आणि भरपूर पाणी पिते. पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, शरीर ताजेतवाने राहते आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसून येतो. त्यामुळे, दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं गर्भधारणेच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.