अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप नुकतेच एका पत्रकारपरिषदेत म्हणाले की गरोदर मातांना डॉक्टरांनी पेनकिलर म्हणून पॅरासिटोमोल देऊ नये त्यानं बाळाच्या वाढीवर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यानंतर जगभरातच या विषयाची चर्चा सुरु झाली आणि प्रश्न आला की खरंच ट्रंप म्हणतात ते खरं आहे का? पॅरासिटोमोल घेऊ नये का गरोदर असताना? डॉक्टर काय म्हणतात पाहू..
गर्भावस्था हा स्त्रियांच्या आयुष्यातला अतिशय नाजुक काळ. या काळात कोणतीही गोष्ट करताना गर्भवती महिलांच्या डोक्यात आधी हाच विचार येतो की आपण करत असणारी गोष्टी बाळासाठी हानिकारक तर नाही ना, त्याचा बाळाला काही त्रास तर होणार नाही ना.. हा विचार होणाऱ्या आईच्या मनात येणं अगदी साहजिक आहे. पण असं करणं खरंच योग्य आहे का याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली खास माहिती...(is it safe to take Paracetamol tablets during pregnancy?)
गर्भावस्थेत पॅरासेटीमॉल घेणं कितपत योग्य?
गर्भवती महिलांनी जर पॅरासेटीमॉल घेतली तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर होतो का याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmanasinaralkar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चिप्स नेहमीच खावे वाटतात? ३ उपाय- त्या पदार्थांची आठवणही येणार नाही
यामध्ये त्या सांगतात की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील इतर संस्थांनीही असं स्पष्टपणे सांगितलं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भावस्थेत असताना जर तुम्ही पॅरासेटीमॉलसारखी औषधी घेतली तर त्याचा गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. कित्येक प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून हा अभ्यास मांडण्यात आलेला आहे.
त्यामुळे गर्भावस्थेत पॅरासेटीमॉल घेणं आणि बाळ स्वमग्न होणं यांचा काहीही संबंध नाही. ही भीती मनातून काढून टाकायला हवी.
सणासुदीसाठी खास टिप्स- छोटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठं- ५ सोपे बदल करा...
कारण जर गर्भवती महिलांच्या अंगात ताप असूनही त्या गोळी घेणं टाळत असतील तर अंगातला ताप वाढून त्याचा मात्र पोटातल्या बाळाला निश्चितच त्रास होऊ शकताे. त्यामुळे मनाने नाही, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मात्र गर्भावस्थेत खूप त्रास होत असेल तर पॅरासेटीमॉल घ्यायला हरकत नाही.