Late Childbirth Research : गर्भवती महिला किंवा प्रसुतीनंतरच्या गोष्टींसंबंधी वेगवेगळी संशोधनं नेहमीच समोर येत असतात. बाळांना जन्म देण्याच्या वयाबाबतही नेहमीच चर्चा होत असते. ३० ते ३५ वयाच्या आता अपत्य होणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य मानलं जातं. तर ४० वय हे अवघड मानलं जातं. पण अलिकडेच एक आश्चर्यकारक रिपोर्ट समोर आला आहे.
दीर्घायुषी कुटुंबांवर करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, ज्या महिलांना उशिरा म्हणजेच अधिक वय झाल्यानंतर अपत्य होते, त्या स्वतःदेखील अधिक काळ जगतात. ५५१ कुटुंबांवर हे संशोधन करण्यात आलं.
यात असं आढळून आलं की, ज्या महिलांनी ३३ वयानंतर शेवटचे अपत्य जन्माला घातले, त्या २९ वर्षांपूर्वी अपत्यप्राप्ती थांबवणाऱ्या महिलांच्या तुलनेत ९५ वर्षांपर्यंत जगण्याची दुप्पट शक्यता होती.
१९८ शतायुषी महिलांवरील दुसऱ्या अभ्यासात असे दिसून आले की ज्या महिलांना ४० वर्षांनंतर अपत्य झाले, त्या ७० च्या दशकात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या तुलनेत १०० वर्षे जगण्याची चारपट अधिक शक्यता होती.
संशोधकाचं एक असंही मत आहे की, उशिरा अपत्यप्राप्ती ही दीर्घायुष्याची खात्री नाही. हे निष्कर्ष कदाचित महिलांच्या आनुवंशिकता आणि एकूण आरोग्यस्थितीचे प्रतिबिंब असू शकतात.
काही संशोधकांचे मत आहे की ज्या महिलांना उशिरा मातृत्व प्राप्त होते, त्या सामान्यपणे शिक्षित, आरोग्यासंबंधी जागरूक आणि जीवनशैलीविषयी सजग असतात. अशा महिलांमध्ये धूम्रपानाची सवय कमी असते, ज्यामुळे त्यांचे दीर्घायुष्य वाढू शकते.
गर्भधारणेशी संबंधित जोखीम
उशिरा गर्भधारणेमुळे काही फायदे असले तरी त्यासोबत काही धोकेही असतात. प्रसवकाळातील वय वाढल्यास प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.
गर्भावस्थेतील हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस - अभ्यासानुसार, उशिरा मातृत्व असलेल्या महिलांमध्ये गर्भावस्थेत डायबिटीसआणि हाय बीपी यांचा धोका अधिक असतो.