>आरोग्य >गरोदरपण > Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

गरोदरपण जसं सुरू होतं, तसं ती स्त्री बाळांतपणाचा विचार करू लागते. अनुभवी स्त्रियांकडून वेगवेगळी  माहिती कळाल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी, असं तिला हळूहळू वाटू लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सोसण्यासाठी शरीरही तेवढंच सशक्त असणं गरजेचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:50 PM2021-07-20T16:50:39+5:302021-07-20T17:01:22+5:30

गरोदरपण जसं सुरू होतं, तसं ती स्त्री बाळांतपणाचा विचार करू लागते. अनुभवी स्त्रियांकडून वेगवेगळी  माहिती कळाल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी, असं तिला हळूहळू वाटू लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सोसण्यासाठी शरीरही तेवढंच सशक्त असणं गरजेचं आहे.

Exercise for pregnant women which helps for normal delivery | Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Next
Highlightsगरोदरपणात जो व्यायाम कराल, तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. व्यायाम करताना कोणतेही अनाठायी धाडस करू नये. प्रकृती सांभाळूनच व्यायाम करावा.

गरोदरपणात शरीराला व्यायामाची नितांत गरज असते. या काळात शरीर जेवढे फ्लेक्झिबल असेल, तेवढे ते चांगले असते. त्यामुळे गरोदरपणात सुरूवातीला होणारा त्रास जरा कमी झाला, की प्रत्येक गरोदर स्त्री ने तज्ज्ञांच्या मदतीने काही व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत. नियमित व्यायाम केल्याने प्रसवकळा सोसण्यासाठी शरीर तयार तर होतेच, पण त्यासोबतच मनही खंबीर होत जाते. कारण बाळांतकळा देताना शरीर आणि मन दोन्हीही कणखर असणे गरजेचे असते. 

 

गरोदर महिलांनी करावेत असे व्यायाम
नियमितपणे चालणे हा गरोदर पणातला सर्वोत्तम व्यायाम आहे.
स्ट्रेचिंग
मानेचे व्यायाम
भ्रामरी प्राणायाम
मार्जरासन


वज्रासन
पर्वतासन
दोन्ही प्रकारचे कोनासन
त्रिकोणासन
वीरभद्रासन
पश्चिमोत्तानासन
सर्वांगासन
बटरफ्लाय आसन

 

गरोदरपणात व्यायाम का करावे ?
व्यायामामुळे ओटीपोट, पाठ आणि मांडीचे स्नायु बळकट होतात. प्रसवकळा देताना हे स्नायू बळकट असणे खूप आवश्यक असते. हे स्नायू बळकट नसतील, तर डिलिव्हरीच्या वेळी कळा देताना शक्ती राहत नाही, कळा सहन करणे शक्य होत नाही. शेवटी त्या स्त्रीला खूप थकवा आल्याने डॉक्टरांना नाईलाजाने सिझेरियनचा पर्याय निवडावा लागतो. 

गरोदर महिलांनी व्यायाम करताना अशी काळजी घ्यावी
१. जर्की आणि बाऊंसिंग मुव्हमेंट करू नये.
२. पहिल्यांदाच जेव्हा एक्सरसाईज सुरू कराल, तेव्हा पहिले काही दिवस आठवड्यातून तीन दिवसच व्यायाम करा. त्यानंतर हळूहळू दिवस वाढवत न्या.
३. सुरूवातीला दोन आठवडे केवळ वार्मअप व्यायाम करा.


४. वार्मअप- एक्सरसाईज, कुल डाऊन हा क्रम पाळायला हवा.
५. अतिकष्टाचे आणि त्रासदायक व्यायामप्रकार करणे टाळा. व्यायाम करताना जर खूपच त्रास होतो आहे, असे वाटले की लगेच थांबावे आणि रिलॅक्स व्हावे.
६. व्यायाम करण्याची जागा हवेशीर असायला हवी. 
७. व्यायाम करताना तुमचे हर्टबीट १४० पेक्षा जास्त व्हायला नको.
८. पाणी किंवा एनर्जी ड्रिंक व्यायामाच्या आधी, मधे आणि नंतरही थोडे- थोडे घेत रहा. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही आणि थकवा येणार नाही.


 

Web Title: Exercise for pregnant women which helps for normal delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

स्ट्रेच इट लाइक आलिया भट; दिवसाची प्रसन्न सुरुवात हवी तर करून पाहा असे स्ट्रेचिंग - Marathi News | Stretch It Like Alia Bhatt; If you want a happy start to the day, try stretching | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेच इट लाइक आलिया भट; दिवसाची प्रसन्न सुरुवात हवी तर करून पाहा असे स्ट्रेचिंग

चाहत्यांना प्रेरणा देणारा बॉलिवूड अभिनेत्रींचा फिटनेस फंडा तुम्हीही करु शकता फॉलो ...

डोक्यातला किचाट संपवून ‘मूड मेकओव्हर’ करायचाय? रोज एकच सोपी गोष्ट करा, पाहा जादू! - Marathi News | how to do 'mood makeover'? Do one simple thing every day, see the magic! year end challenge. mental health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यातला किचाट संपवून ‘मूड मेकओव्हर’ करायचाय? रोज एकच सोपी गोष्ट करा, पाहा जादू!

मूड मेकओव्हर नावाची ही नवी कल्पना स्वीकारा. ३० दिवस रोज एक गोष्ट नवीन करायची, वर्ष संपतं आहे डिसेंबरमध्ये घेणार का हे चॅलेंज? ...

हिवाळ्यात पाठ आणि कंबरदुखी छळते? थकवा येतो, एनर्जी कमी पडते? रोज करा फक्त २ आसने.. - Marathi News | back pain, Fatigue, lack of energy in winter? keep yourself fit with yoga, naukasana and setu bandhasana, yoga in winter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात पाठ आणि कंबरदुखी छळते? थकवा येतो, एनर्जी कमी पडते? रोज करा फक्त २ आसने..

नौकासन आणि सेतूबंधासन ही दोन आसनं रोज करा, एनर्जी वाढेल, दिवसभर थकवा येणार नाही. दुखणीखुपणीही कमी होतील. ( yoga and fitness, yoga in winter) ...

खा चमचाभर गुलकंद, तबियत खुश! उत्तम गुलकंद करण्याची कृती, शुद्ध गुलकंदाचे फायदे खूप - Marathi News | Eat a spoonful of gulkand, good health! The best way to make a lot of sweetmeats is to use them | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खा चमचाभर गुलकंद, तबियत खुश! उत्तम गुलकंद करण्याची कृती, शुद्ध गुलकंदाचे फायदे खूप

Recipe: how to make gulkand- गावरान गुलाबांचा (rose) मस्त गुलकंद.. रोज एक चमचा खा आणि मिळणारे भन्नाट फायदे (benefits of eating gulkand)स्वत:च अनुभवा..  ...

पांढरीफटक नखं, निस्तेज त्वचा, चिडचिड, थकवा आणि छातीत धडधड ही कसली लक्षणं? पाहा तपासून - Marathi News | Symptoms of Iron deficiency- white nails, pale skin, irritability, fatigue and chest tightness.. Check it out | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरीफटक नखं, निस्तेज त्वचा, चिडचिड, थकवा आणि छातीत धडधड ही कसली लक्षणं? पाहा तपासून

Iron deficiency : रूक्ष आणि निस्तेज त्वचा, सारखी चिडचिड, रोजच येणारा थकवा, सारखे तुटणारे केस आणि नखं.. हा त्रास अनेक महिलांमध्ये कॉमन आहे. तुम्हाला माहिती आहे का ही सगळी कशाची लक्षणं आहेत ते? ...

Healthy Desi Ghee Benefits : कोण म्हणतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं? चांगल्या तब्येतीसाठी पांढरं तूप खायचं की पिवळं, वाचा फायदे - Marathi News | Healthy Desi Ghee Benefits : Yellow vs white which variety of desi ghee is healthier and why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरं की पिवळं? चांगल्या तब्येतीसाठी कोणतं तूप खायचं? वाचा गुणकारी फायदे

Healthy Desi Ghee Benefits : काहीजणांना वाटतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं. म्हणून ते तूप खाणं टाळतात. गावठी तूप देखील दोन प्रकारचं आहे. एक पिवळं तूप आणि दुसरे पांढरं तूप. पांढरं तूप म्हशीच्या दुधापासून तर पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते. ...