कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून, नुकतेच तिने आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले आरोग्य आणि फिटनेसबद्दल अपडेट शेअर केला आहे. भारती सिंग म्हणते की, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी आपली शुगर तपासली, जी अपेक्षेपेक्षा खूप जास्त वाढलेली होती. पुढे ती म्हणाली "मी तर गोडही खात नाही. पथ्य देखील पाळत आहे, तरीही शुगर वाढत आहे."(gestational diabetes risks for baby).
गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात आणि याच काळात काही महिलांमध्ये अचानक शुगर लेव्हल वाढणे किंवा गेस्टेशनल डायबिटीस दिसून येतो. ही अवस्था तात्पुरती असली तरी तिचा आईच्या आणि बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. अनियमित ब्लड शुगरमुळे थकवा, जास्त भूक किंवा तहान यांसारखी लक्षणे दिसतातच, पण योग्य काळजी न घेतल्यास प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत, बाळाचे जास्त वजन किंवा नंतर आई-बाळ दोघांनाही डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत वाढलेली शुगर वेळेवर ओळखणे, कारणे समजून घेणे आणि योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारती सिंग (bharti singh pregnancy diabetes) हिच्या प्रेग्नेंसीमधील हाय शुगर वाढण्याच्या या प्रकरणामुळे, गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांनी एका संकेतस्थळाला दिलेली माहिती जाणून घेऊया. प्रेग्नेंसीमध्ये डायबिटीस वाढल्यास बाळावर त्याचे काय परिणाम होतात आणि यावर नियंत्रण कसे ठेवता येते, या विषयावर अधिक माहिती पाहूयात...
प्रेग्नेंसीमध्ये शुगर वाढण्याची कारणे...
यूट्यूब व्हिडिओमध्ये गायनेकोलॉजिस्ट डॉ. सुप्रिया पुराणिक सांगतात की, प्रेग्नेंसीदरम्यान शुगर वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण, गर्भधारणेमध्ये एस्ट्रोजन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरोन (Progesterone) सारखे हार्मोन्स वेगाने वाढतात, ज्यामुळे शरीराचे कार्बोहायड्रेट चयापचय क्रिया प्रभावित होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.
गारठ्याने होतो सर्दी - खोकला, वाढते घशाची खवखव? करा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...
या परिस्थितीत प्रेग्नेंसीचा धोका वाढतो...
तज्ज्ञ पुढे सांगतात की, जर कुटुंबामध्ये, जसे की आई किंवा वडील यापैकी कोणालाही मधुमेहाचा त्रास असेल, किंवा तुमच्या पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये शुगर वाढली असेल, तर पुढील गर्भधारणेतही शुगर वाढण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त, पीसीओडी (PCOD) आणि जास्त वजन असल्यास देखील या आजाराचा धोका वाढतो, ज्याला गर्भकालीन मधुमेह (Gestational Diabetes) म्हणतात. साधारणपणे, गर्भकालीन मधुमेहाची लक्षणे दुसऱ्या तिमाहीत दिसू लागतात.
शुगर वाढल्याने बाळाला होणारे धोके...
डॉक्टर पुढे सांगतात की, आईची शुगर वाढल्यास गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाचे वजन वेगाने वाढू लागते. तसेच, बाळाच्या सभोवतालचे अॅम्निओटिक फ्लुईड (Amniotic Fluid) देखील सामान्य प्रमाणापेक्षा जास्त होऊ लागते. याव्यतिरिक्त, प्रसूतीनंतर कधीकधी बाळामध्ये हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia) होऊ शकतो, ज्यामुळे त्याला झटके येणे सुरू होते. जर शुगरची पातळी खूप जास्त वाढली, तर ही स्थिती बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते.
मुलं वेडीवाकडी कशीही, पोक काढून बसतात ? पालकांनी करावेत ४ उपाय - बॉडी पोश्चर होईल चांगले...
लगेच उपचार करणे आहे गरजेचे...
आयव्हीएफ स्पेशलिस्ट सांगतात की, प्रेग्नेंसीच्या कोणत्याही टप्प्यावर शुगर वाढल्यास, त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक असते. कारण, गर्भधारणेदरम्यान वाढलेल्या मधुमेहामुळे बाळापर्यंत जाणाऱ्या रक्तप्रवाहातील शुगरची पातळी देखील जास्त होते. ही वाढलेली शुगर बाळाच्या स्वादुपिंडाला उत्तेजित करते, ज्यामुळे ते गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करू लागते.
प्रेग्नेंसीमध्ये शुगर कशी नियंत्रित करावी...
तज्ज्ञ शेवटी सांगतात की, म्हणूनच प्रेग्नेंसीदरम्यान वाढलेल्या शुगरकडे कधीही दुर्लक्ष करू नये. योग्य आहार आणि सोप्या औषधांच्या मदतीने यावर सहजपणे नियंत्रण मिळवता येते. यासाठीच महिलांसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.
