Is Wearing Tight Jeans Bad For Women: मुलींना बालपणापासूनच आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. स्वच्छतेसोबतच प्रजननासंबंधी सुद्धा त्यांना शिकवलं जातं. या गोष्टी घरातीलच मोठ्या महिला त्यांना शिकवत असतात. सोबतच शाळेतूनही त्यांना शिकायला मिळतं. पण काही महिलांचं असं मत असतं की, टाइट जीन्स घातल्यानं प्रजनन क्षमतेचं नुकसान होतं. हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. पण काय हे खरंच होतं की केवळ एक गैरसमज आहे? याबाबत डॉक्टरांनी स्पष्टपणे काही माहिती दिली आहे.
Onlymyhealth.com या हेल्थसंबंधी वेबसाइटला डॉ. मनन गुप्ता यांनी माहिती दिली की, टाइट जीन्स घातल्यानं प्रजनन क्षमतेचं नुकसान होतं ही बाब पूर्णपणे बरोबर नाही. कारण, टाइट जीन्स घालण्याचा फर्टिलिटीसोबत थेट कनेक्शन नसतं. पण टाइट जीन्समुळे एकंदर रिप्रोडक्शन हेल्थवर प्रभाव पडतो. टाइट जीन्स घातल्यानं महिलांची प्रजनन क्षमता प्रभावित होत नाही. याचा अर्थ गर्भधारणेच्या क्षमतेचं नुकसान होत नाही. पण जर नेहमीच टाइट जीन्स घालत असाल तर यामुळे इतर समस्यांचा धोका वाढतो.
टाइट जीन्समुळे होणारे नुकसान
इन्फेक्शनचा धोका
नेहमीच आणि जास्त वेळासाठी टाइट कपडे घातल्यानं महिलांना वेगेवगळ्या इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. जास्त वेळ टाइट जीन्स घातल्यानं प्रायव्हेट पार्टमध्ये घाम जास्त येतो. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात. यानं इन्फेक्शन होतं.
व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन
टाइट जीन्स घातल्यानं व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिअल वेजिनोसिस होण्याचा धोका असतो. अनेकदा या इन्फेक्शनबाबत समजत नाही. जर वेळीच यावर उपचार घेतले नाही तर रिप्रोडक्टिव ट्रॅक्ट प्रभावित होऊ शकतं.
घर्षण आणि जळजळ
टाइट जीन्समुळे घर्षण, जळजळ आणि पेल्विक एरियामध्ये म्हणजे ओटी पोटाच्या भागात तापमान वाढू शकतं. पण यामुळे इनफर्टिलिटी होत नाही. मात्र, सतत टाइट, सिंथेटिक कपडे घातले तर व्हजायनल हेल्थचं नुकसान होतं.
पुरूषांनी टाइट कपडे घालणं नुकसानकारक असतं का?
एक्सपर्टनुसार महिलांप्रमाणेच पुरूषांना सुद्धा टाइट जीन्स घातल्यावर काही समस्या होतात. तसेच टाइट अंडरविअर घातल्यास स्पर्म प्रोडक्शन कमी होऊ शकतं. याचं कारण टाइट अंडरविअरमुळे हीट प्रोड्यूस होते. अशात पुरूषांना प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शनचा धोकाही असतो.