'आई होणे' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक खूप खास आनंदाचा क्षण असतोच. एका आई सोबतच बाळाचा जन्म होत असला हा जरी आनंदाचा आणि सुखद प्रसंग असला तरी तरी त्यासोबत येणाऱ्या वेदना नकोशा वाटतात. बाळंतपणाच्या वेळी येणाऱ्या प्रसूतीवेदना (लेबर पेन) हा एक अत्यंत वेदनादायक अनुभव असतो. या वेदना शारीरिक आणि मानसिक (Doctor Revealed The Secret To Reduce The Labour Pain) अशा दोन्ही पातळ्यांवर परिणाम करणाऱ्या असतात. बाळंतपणाच्या वेळी (Labor Pain Relief Options) येणाऱ्या प्रसूतीवेदना (लेबर पेन) सोसणे म्हणजे काहीजणींसाठी भीतीदायक अनुभव असतो. यासाठीच, या वेदना सुसह्य करण्यासाठी विविध उपाय आजमावून पाहिले जातात. या वेदना नैसर्गिक (Labor Pain Management & Relief) असून बाळाच्या सुरक्षित जन्मासाठी महत्त्वाच्या असल्या तरी, त्या कमी करण्यासाठी अनेक आधुनिक व पारंपरिक उपाय केले जातात(How to Relieve Pain During Labor).
अभिनेत्री छावी मित्तल यांच्या पॉडकास्टमध्ये डॉ. रीमा रांका यांनी प्रसूतीवेदना (लेबर पेन) कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. बदलत्या काळानुसार, लेबर पेन कमी करण्यासाठी एपिड्युरल अॅनेस्थेशिया, पेन मॅनेजमेंट थेरपी, योग, प्राणायाम, मालिश, उबदार पाण्याचा वापर असे अनेक उपाय केले जातात, परंतु याच उपायांसोबत प्रसूतीवेदना (लेबर पेन) कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे तितकेच फायदेशीर ठरते, असे डॉ. रीमा रांका यांनी सांगितले आहे. प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकासाठी उपायसुद्धा वेगळा असू शकतो. योग्य माहिती, प्रसूतीपूर्व सल्ला, आणि डॉक्टरांचा मार्गदर्शन घेतल्यास या वेदना कमी करून बाळंतपणाचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो.
डॉ. रीमा यांच्या मते, लेबर पेन कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतात. NCBI च्या एका संशोधनानुसार , श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे प्रसूती वेदनांचा कालावधी कमी होतो. या अभ्यासात असे म्हटले आहे की यामुळे प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्याचा वेळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरू नका! WHO ने सांगितलेल्या 'हे' उपाय, उच्च रक्तदाब नियंत्रणात...
ScienceDirect या रिसर्चनुसार, लेबर पेनच्या पहिल्या टप्प्यात श्वसनाचे व्यायाम (Breathing Exercises) केल्यास पुशिंगचा कालावधी कमी होतो आणि वेदनांची तीव्रता देखील कमी होते. म्हणजेच, जर सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने श्वास घेतला गेला, तर शेवटी बाळाला बाहेर ढकलताना (pushing) लागणारा वेळ कमी होतो आणि वेदना सुसह्य वाटतात.
प्रसूतीदरम्यान आई आणि बाळ दोघांचीही ऑक्सिजनची गरज सुमारे ५३ % वाढते. या वाढलेल्या गरजेची पूर्तता करण्यासाठी श्वासोच्छ्वासाचे योग्य तंत्र (Breathing Exercises) अत्यंत उपयुक्त ठरते. या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराच्या स्नायूंना ऑक्सिजन अधिक वेगाने आणि पुरेशा प्रमाणात मिळू लागतो.
जिभेचा रंग सांगतो तब्येत बरी आहे की बिघडली? जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलला तर....
यामुळे नुसतेच शरीराला ऊर्जा मिळते, असे नाही – तर थकवा कमी जाणवतो, मन शांत राहते आणि त्यामुळे लेबर पेन कमी जाणवतो. लेबर पेन दरम्यान श्वासोच्छ्वासाचे काही व्यायाम केल्यास प्रसूतीदरम्यान नियंत्रण टिकवून ठेवणे सोपे होते. म्हणूनच, प्रसूतीपूर्व काळात श्वसनाच्या सरावाला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे.
लेबर पेनदरम्यान जर तुम्ही श्वसनाचे व्यायाम (Breathing Exercises) करत असाल, तर त्याचा तुमच्या शरीरावर फारच सकारात्मक परिणाम होतो. या व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचं एक नैसर्गिक रसायन स्रवू लागतं, ज्याला आपण ‘हॅप्पी हार्मोन’ असंही म्हणतो. हे हार्मोन शरीरातील वेदनांचे संकेत (pain signals) मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून थांबवतं.
या प्रक्रियेमुळे तुमचं लक्ष वेदनांवरून हटतं आणि मन अधिक स्थिर राहतं. परिणामी, लेबर पेन सुसह्य करणे अधिक सोपं होतं, आणि तुम्ही संपूर्ण प्रसूती प्रक्रियेला सकारात्मकपणे तोंड देऊ शकता.
म्हणूनच, श्वासोच्छ्वासाच्या साध्या पण प्रभावी अशा तंत्राचा वापर केल्यास, केवळ शरीरालाच नाही तर मनालाही मोठा दिलासा मिळतो आणि संपूर्ण बाळंतपणाचा अनुभव अधिक सुसह्य करता येतो.