बाळ झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मोठा बदल घडून येतो. मग ती स्त्री एखादी सामान्य महिला असो किंवा मग दीपिका पदुकोणसारखी मोठी सेलिब्रिटी असो. प्रत्येक आईला तिच्या बाळासाठी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागतेच. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून बाळाची जबाबदारी घ्यावी लागते. गर्भारपणाचे ९ महिने आणि त्यानंतर बाळ झाल्यावर सुरुवातीची काही वर्षे आई पुर्णपणे बाळामध्ये अडकलेली असते. या काळात तिला किती मानसिक आणि शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते हे दुसरी एखादी आईच समजू शकते. त्याच अनुभवातून सध्या जात असणाऱ्या दीपिकानेही तिचा मातृत्वाचा प्रवास काही सोपा नव्हता, असे सांगितले आहे.(Deepika Padukone Revealed Her Pain During Pregnancy And Delivery)
दीपिका पदुकोण कदाचित पहिल्यांदाच तिच्या गरोदरपणाबद्दल आणि मातृत्वाबद्दल बोलली असावी.. viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये दीपिका असं सांगते आहे की तिच्या बाळंतपणाचे दिवस खरोखरच खूप कठीण होते.
सकाळच्या कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन D मिळतं असं तुम्हालाही वाटतं? बघा हाडांचे डॉक्टर काय सांगतात..
गरोदरपणाचा आठवा आणि नववा महिना खूप जास्त शारिरीक वेदना देणारा होता. शेवटच्या दोन महिन्यांमध्ये शारिरीक हालचाल करणेही खूप जास्त कठीण जात होते. पाठ प्रचंड दुखत होती आणि आपल्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी बाक येत आहे, हे स्पष्टपणे दिसत होतं, जाणवत होतं.
समोर पोट वाढायला लागलं की साहजिकच पाठीच्या कण्याच्या खालच्या भागावर ताण येतो आणि पाठ- खांदेही किंचित झुकल्यासारखे होते. हा बदल आई झालेल्या बहुतांश महिला अनुभवतातच.
सुपरक्लासी लूक देणाऱ्या मंडाला प्रिंट साड्यांचे देखणे प्रकार, ऑफिससाठी नेसायलाही एकदम बेस्ट
तेच दीपिकानेही सांगितले. ती म्हणते की या सगळ्या काळात माझ्या भोवताली असणाऱ्या माझ्या सपोर्ट सिस्टीममुळे त्रास सहन करणे सोपे गेले. आता सध्या ती थोडा ब्रेक घेऊन तिच्या लेकीकडे लक्ष केंद्रित करत असून मुलीसोबतचे निरागस क्षण एन्जॉय करते आहे..