Join us

बाळांच्या जन्मानंतरही आलिया-दीपिका इतक्या फिट कशा दिसतात? त्यांच्या फिटनेस ट्रेनरनं सांगितलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:58 IST

After Delivery Fitness Secret : दीपिका पादुकोन आणि आलिया भट्ट प्रेग्नेंसीनंतर इतक्या फिट कशा दिसतात याचं रहस्य त्यांच्या फिटनेस  ट्रेनरनेच सांगितलं.

After Delivery Fitness Secret : आई होणं प्रत्येक महिलेच्या जीवनातील एक सगळ्यात महत्वाची घटना असते. यात आनंदही असतो आणि त्रासही असतो. बाळाच्या जन्मानंतर सहा महिने तर बाळाची भरपूर काळजी घ्यावी लागतेच, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. बाळाच्या संगोपनासोबतच स्वत:च्या फिटनेसची काळजी घेणंही आव्हानात्मक असतं. कारण अनेकदा आपण पाहतो की, बाळाच्या जन्मानंतर महिलांचं वजन वाढतं आणि त्याची त्यांना चिंता लागून राहिलेली असते. पण तेच जेव्हा एखादी बॉलिवूड अभिनेत्री आई होते, तेव्हा काही दिवसांमध्येच त्या आधीसारख्या स्लिम आणि फिट दिसू लागतात. त्यांना बघून अनेक महिलांच्या मनात प्रश्न येतो की, अखेर त्यांच्या या फिटनेसचं सिक्रेट काय असतं. दीपिका पादुकोन आणि आलिया भट्ट प्रेग्नेंसीनंतर (Deepika Padukone And Alia Bhatt Fitness Secret) इतक्या फिट कशा दिसतात याचं रहस्य त्यांच्या फिटनेस  ट्रेनरनेच सांगितलं.

ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आणि आलिया भट्टसहीत (Alia Bhatt) अनेकांना ट्रेनिंग दिलं आहे. जेव्हा दीपिका आणि आलियाची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यांनीच दोघींना ट्रेन केलं. त्यामुळेच त्या इतक्या फिट आणि स्लिम दिसतात. दोघींकडे बघून जराही असं वाटत नाही की, त्यांनी अलिकडेच बाळांना जन्म दिलाय. 

दीपिका आणि आलियाच्या फिटनेसचं रहस्य

यास्मिन कराचीवाला यांनी सांगितलं की, दीपिकानं डिलिव्हरीनंतर काही दिवसांमध्येच पिलाटे सुरू केला होता. पिलाटे वेगवेगळ्या एक्सरसाईजचा एक फॉर्म आहे. ज्यात मसल्सवर काम केलं जातं. ज्यामुळे बेली फॅट म्हणजेच पोटावर वाढलेली चरबी कमी होते. बरेच सेलेब्स एक्सरसाईजचा हा फॉर्म फॉलो करतात. महत्वाची बाब म्हणजे याद्वारे एकाचवेळी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यास्मिन सांगतात की, आलियाने सुद्धा पिलाटेनं सुरूवात केली होती आणि काही महिन्यात ती आधीसारखी स्लिम फिट झाली होती. दोघींसाठी पिलाटेसोबतच एक्सरसाईजचा एक प्लान तयार करण्यात आला होता.

काय ठरतं महत्वाचं?

ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांच्यानुसार डिलिव्हरीनंतर फिट दिसण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. त्या सांगतात की, दीपिका आणि आलियानं एक्सरसाईजसोबतच कमिटमेंट आणि डिसिप्लिनच्या मदतीनं फिटनेस परत मिळवली. जर कुणाला डिलिव्हरीनंतर फिट रहायचं असेल, वजन वाढू द्यायचं नसेल तर या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. दोघींनीही काही कारणं सांगून शेड्यूल मिस केलं नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Alia, Deepika's post-delivery fitness: Trainer reveals their secrets.

Web Summary : Deepika Padukone and Alia Bhatt regained their fitness post-delivery through Pilates and consistent exercise. Their trainer, Yasmin Karachiwala, emphasized commitment and discipline as crucial for achieving pre-pregnancy figures. Both stars diligently followed exercise plans, prioritizing fitness without excuses.
टॅग्स : प्रेग्नंसीफिटनेस टिप्स