Contraceptives injection side effects : अवेळी गर्भधारणा टाळायची असेल तर जास्तीत जास्त महिला गर्भनिरोधकांचा वापर करतात. काही महिला यासाठी गोळ्या खातात तर काही महिला इंजेक्शन घेतात. गर्भधारणा रोखण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. पण कधी कधी हे उपाय खूप घातक ठरतात. ब्रिटनमधील एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. एका छोट्याशा मेडिकल प्रक्रियेने तिला मोठं अडचणीत आणलंय.
द मिररच्या एका रिपोर्टनुसार, या महिलेने गर्भनिरोधक इंजेक्शन घेतल्यानंतर काही वेळात आपली दृष्टी गमावली. आधी तिचं डोकं दुखलं आणि नंतर धुसर दिसू लागलं. पण नंतर तिला दिसणं पूर्णपणे बंद झालं. रिपोर्टनुसार, महिलेने आपल्या सुविधेसाठी कंट्रासेप्टिव इंजेक्शनचा पर्याय निवडला होता. इंजेक्शन लावल्यानंतर काही आठवड्यांनंतरच तिला डोक्यामागे दबाव आणि डोळ्यांमध्ये जडपणा जाणवू लागला होता.
आधी महिलेला वाटलं की, कामामुळे किंवा थकव्यामुळे असं होत असेल. पण जेव्हा दिसणं खूप जास्त कमी झालं तेव्हा ती घाबरली. डॉक्टरांनी जेव्हा टेस्ट केल्या तेव्हा समोर आलं की, तिच्या शरीराने या हार्मोनल बदलाला फार गंभीर प्रतिक्रिया दिली होती.
इडियोपॅथिक इंट्राक्रॅनील हायपरटेंशन काय आहे?
टेस्टमधून समोर आलं की, महिलेला इडियोपॅथिक इंट्राक्रॅनील हायपरटेंशन नावाच्या दुर्मिळ स्थितीचा सामना करावा लागला होता. गर्भनिरोधकामधील हार्मोन्समुळे तिच्या मेंदूच्या आजूबाजूला द्रव्याचा दबाव खूप वाढला होता. याच दबावाचा प्रभाव थेट ऑप्टिक नर्व्हवर पडला, ज्यामुळे नसा बऱ्याच डॅमेज झाल्या. याच कारणाने तिची बघण्याची क्षमता नष्ट झाली.
यानंतर निकोलाला अनेक आठवडे हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं. डॉक्टरांनी तिच्या मेंदूमधील दबाव कमी करण्यासाठी वेगवेगळे उपचार केले. पण तिची दृष्टी पूर्णपणे परत आली नाही. आता महिला सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना संदेश देत आहे की, कोणत्या हार्मोनल गर्भनिरोधकांचा वापर करण्याआधी होणाऱ्या संभावित धोक्यांबाबत डॉक्टरांसोबत सविस्तर बोललं पाहिजे.
दुसरीकडे एक्सपर्टचं मत आहे की, अशा केसेस फार कमी बघायला मिळतात. पण असा धोका होऊ शकतो हे नाकारलंही जाऊ शकत नाही. जर कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक घेतल्यावर डोकेदुखी, अंधारी किंवा चक्कर येणे अशी लक्षणं दिसत असतील, तर यांकडे कानाडोळा करू नये. त्यामुळे एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधकंही घेऊ नये.
Web Summary : A UK woman lost her sight after a contraceptive injection. Doctors diagnosed idiopathic intracranial hypertension, caused by hormonal changes affecting the optic nerve. She urges women to discuss contraceptive risks with doctors. Experts advise caution and immediate consultation for any adverse symptoms like headaches or blurred vision.
Web Summary : यूके की एक महिला ने गर्भनिरोधक इंजेक्शन के बाद अपनी दृष्टि खो दी। डॉक्टरों ने इडियोपैथिक इंट्राक्रैनियल हाइपरटेंशन का निदान किया, जो हार्मोनल परिवर्तनों के कारण ऑप्टिक तंत्रिका को प्रभावित करता है। उसने महिलाओं से गर्भनिरोधक के जोखिमों पर डॉक्टरों से चर्चा करने का आग्रह किया। विशेषज्ञों ने सिरदर्द या धुंधली दृष्टि जैसे किसी भी प्रतिकूल लक्षण के लिए सावधानी और तत्काल परामर्श की सलाह दी है।