Lokmat Sakhi >Health >Pregnancy > चिनी शास्त्रज्ञांनी बनवला ‘प्रेगनन्सी रोबोट’, त्याच्या गर्भपिशवीत वाढेल बाळ- आईशिवाय बाळाच्या जन्माची तयारी..

चिनी शास्त्रज्ञांनी बनवला ‘प्रेगनन्सी रोबोट’, त्याच्या गर्भपिशवीत वाढेल बाळ- आईशिवाय बाळाच्या जन्माची तयारी..

Pregnancy Robot : म्हणजे हे जरा विचित्रच वाटू शकतं की, बाळाला जन्म देण्यासाठी महिलेच्या गर्भाची गरज पडणार नाही. पण असा दावा एका कंपनीनं केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:34 IST2025-08-21T15:04:57+5:302025-08-21T16:34:27+5:30

Pregnancy Robot : म्हणजे हे जरा विचित्रच वाटू शकतं की, बाळाला जन्म देण्यासाठी महिलेच्या गर्भाची गरज पडणार नाही. पण असा दावा एका कंपनीनं केला आहे.

China begins preparation for no women's womb to give birth to baby humanoid robots in progress | चिनी शास्त्रज्ञांनी बनवला ‘प्रेगनन्सी रोबोट’, त्याच्या गर्भपिशवीत वाढेल बाळ- आईशिवाय बाळाच्या जन्माची तयारी..

चिनी शास्त्रज्ञांनी बनवला ‘प्रेगनन्सी रोबोट’, त्याच्या गर्भपिशवीत वाढेल बाळ- आईशिवाय बाळाच्या जन्माची तयारी..

Pregnancy Robot : सामान्यपणे एखाद्या बाळाला जन्म द्यायचा असेल तर एका महिलेच्या गर्भाशयाची गरज असते. ज्यात महिला साधारणपणे 9 महिने 9 दिवस भ्रूणाला वाढवतात आणि नंतर बाळाचा जन्म होतो. पण जर आपल्याला सांगितलं की, आता बाळाच्या जन्मासाठी महिलेच्या गर्भाची गरज नाही तर? आपण म्हणाल असं कसं शक्य होईल? पण टेक्नॉलीजीने केलेल्या विकासामुळे शक्य होऊ शकतं. चीनमधील एका डॉक्टरांनी असा दावा केलाय आणि त्यावर कामही सुरू केलं आहे.

म्हणजे हे जरा विचित्रच वाटू शकतं की, बाळाला जन्म देण्यासाठी महिलेच्या गर्भाची गरज पडणार नाही. पण असा दावा एका डॉक्टरांनी केला आहे. तसंही आधीच आपण पाहिलं असेलच की, वेगवेगळ्या ठिकाणी आता रोबोटच कामं करू लागलेत. अशात चीन आणखी पुढे जाऊन यात संशोधन करत आहे. ज्यात मनुष्यांऐवजी रोबोटकडून (Pregnancy Robot) बाळाला जन्म दिला जाईल.

TOI च्या एका रिपोर्टनुसार, बीजिंगमध्ये आयोजित वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स 2025 मध्ये Kaiwa टेक्नॉलॉजीचे फाउंडर डॉ. झांग किफेंग यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, ते एका ह्यूमनॉइड रोबोटवर काम करत आहेत. ज्यात आर्टिफिशियल गर्भाशय (Artificial Womb) असेल. 

हे कधी शक्य होणार?

रिपोर्टनुसार, डॉ. Zhang म्हणाले की, ह्यूमनॉइड रोबोट प्रेगनन्सीचा पहिला प्रोटोटाइप 2026 लॉन्च केला जाईल. ज्याची किंमत साधारण 100,000 युआन म्हणजेच भारतीय करन्सीनुसार जवळपास 12 लाख रूपये इतकी असेल.

नॅचरल काम करेल रोबोटिक गर्भ

ह्यूमनॉइड प्रेगनन्सी रोबोटचा आर्टिफिशियल वॉम्ब म्हणजेच गर्भ खऱ्या गर्भासारखंच काम करेल. यात आर्टि‍फ‍शियल अ‍ॅमनियोटिक फ्लूइड आणि पोषक तत्व पोहोचवण्याची खास पद्धत असेल. 

सरोगसीपेक्षा कमी खर्च

TOI च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, प्रेगनन्सी रोबोटच्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या बाळाचा खर्च सरोगसीपेक्षाही कमी येईल. त्याशिवाय सरोगसीमध्ये कायदेशीर तडजोडीही अनेक असतात. अशात ही रोबोटची नवीन पद्धत कपल्ससाठी फायदेशीर ठरू शकते.

टेक्नॉलॉजी इतकी पुढे जात आहे की आपल्याला विचारही करता येणार नाही. त्यात एआयनं आधीच धूम केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल याचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही.

Web Title: China begins preparation for no women's womb to give birth to baby humanoid robots in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.