How To Consume Amla In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये महिलांना आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या काळात कडधान्य, ड्रायफ्रूट्स, सीड्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळं आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण अनेक महिलांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे प्रेग्नन्सीत आवळा खावा का? याबद्दल आयुर्वेदिक तज्ञांशी जाणून घेतले.
आशा आयुर्वेदाच्या डायरेक्टर आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. चंचल शर्मा यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, प्रेग्नन्सीदरम्यान आवळा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतल्यास तो खूप फायदेशीर असतो.
प्रेग्नन्सीत आवळा खाण्याचे फायदे
डॉ. चंचल शर्मा सांगतात की आवळा प्रेग्नन्सीसाठी सुरक्षित असून तो विविध प्रकारे खाता येतो. परंतु त्याचे सेवन नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मर्यादित प्रमाणात करावे.
आवळ्याचे फायदे
अॅनिमियामध्ये आराम
रोग प्रतिकारक शक्ती वाढते
बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत
ब्लड प्रेशर नियंत्रित राहते
रक्त शुद्ध करण्यास मदत
मॉर्निंग सिकनेस कमी होतो
पचन सुधारते
गर्भावधीमध्ये मधुमेहाचा धोका कमी होतो
इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चनुसार, आवळा जास्त प्रमाणात घेतल्यास बद्धकोष्ठता, जुलाब, अपचन आणि डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे तो मर्यादित प्रमाणातच घ्यावा.
प्रेग्नन्सीत आवळा कसा खावा?
ताजा आवळा खाणे सर्वोत्तम. तो रक्त स्वच्छ ठेवण्यास आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो.
आवळा ज्यूस
आवळा ज्यूस पिऊ शकता, परंतु तो नेहमी पाण्यात मिसळूनच घ्यावा.
आवळा पावडर
आवळा पावडर पाण्यात मिसळून घेतली जाऊ शकते. मात्र त्याचे प्रमाण डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच घ्यावे.
आवळा कँडी
प्रेग्नन्सीत आवळा कँडीही घेता येते. परंतु जर तुम्हाला शुगर किंवा गर्भावधी मधुमेह असेल, तर शुगर-फ्री आवळा कँडीच वापरा.
काय काळजी घ्याल?
आवळा फायदेशीर असला तरी मर्यादित प्रमाणातच खावा. कोणत्याही स्वरूपात आवळा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक. आवळा नेहमीच सकाळी उपाशीपोटी खाणं अधिक फायदेशीर.
