Join us

आईला डायबिटिस असेल-शुगर वाढलेली असेल तर बाळाला स्तनपान करावे का? तज्ज्ञ सांगतात, आईने बाळासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 18:11 IST

Breastfeeding With Diabetes : can diabetic mothers breastfeed : blood sugar and breastfeeding : breastfeeding benefits for diabetics : diabetic mom breastfeeding tips : Is breastfeeding safe with diabetes : योग्य काळजी घेतली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियम पाळले तर मधुमेह स्तनपानात अडथळा ठरत नाही...

अनेकदा महिलांमध्ये गर्भधारणेच्या आधी किंवा नंतर अनेकींना डायबिटिस होतो. अशा परिस्थितीत, डायबिटिस असताना बाळाला स्तनपान करावे का?' हा प्रश्न नव्याने मातृत्व (Breastfeeding With Diabetes) स्वीकारलेल्या अनेक आयांच्या मनात येतो. अनेकजणींना अशी भीती असते की, यामुळे त्यांच्या किंवा बाळाच्या (can diabetic mothers breastfeed) आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना. शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवणे जितकं ( blood sugar and breastfeeding) आवश्यक आहे, तितकंच बाळाला स्तनपान करणे देखील गरजेचे असते. परंतु मधुमेह असताना स्तनपान करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न सतावतो( breastfeeding benefits for diabetics).

मधुमेह असलेल्या स्त्रियांसाठी मातृत्व एक वेगळंच आव्हान असतं. अशा परिस्थितीत, आपल्या बाळाला योग्य पोषण कसे द्यावे, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. विशेषतः मधुमेह असेल तर स्तनपानाबद्दल (diabetic mom breastfeeding tips) अनेक शंका मनात येतात. डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असला तरीही स्तनपान करणे हे आई आणि बाळ दोघांसाठीही खूप फायदेशीर असते. योग्य काळजी घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही नियम पाळले तर मधुमेह स्तनपानात अडथळा ठरत नाही. 

 'मधुमेह' असताना बाळाला स्तनपान करणे योग्य की आयोग्य ?

अमेरिकन डायबिटिस असोसिएशन आणि जगभरातील इतर संस्थेमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या सर्व मातांना स्तनपान देण्याची शिफारस करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर याचा फार मोठ्या प्रमाणात चांगला परिमाण होताना दिसतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या मातांसाठी स्तनपान करणे हे सुरक्षित आणि फायदेशीर असू शकते. स्तनपानामुळे बाळाच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतातच, पण त्याचबरोबर मधुमेही मातांसाठीही ते फायदेशीर ठरते. मधुमेह असताना स्तनपान करण्याचे फायदे आणि सुरक्षितता याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात... 

तुम्ही डाव्या कुशीवर झोपता की उजव्या? झोपेची पोझिशन सांगते तुमचा स्वभाव आणि आरोग्याचीही स्थिती...

१. 'मधुमेह' असताना बाळाला स्तनपान करण्याचे आईला होणारे फायदे... 

१. स्तनपानामुळे आईच्या शरीरातील इन्सुलिन अधिक कार्यक्षमतेने काम करते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

२. ज्या महिलांना गर्भावस्थेत मधुमेह झाला होता (Gestational Diabetes), त्यांच्यात पुढे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता १५ ते ३० % कमी होते.

३. स्तनपान करताना शरीर अधिक उर्जा वापरते, ज्यामुळे बाळंतपणानंतर वजन कमी होण्यास मदत होते.

४. दुध निर्मितीसाठी शरीरातील ग्लुकोज फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे टाइप १ मधुमेह असलेल्या महिलांना इन्सुलिनची गरज २५ ते ५० % पर्यंत कमी भासते.

५. टाइप २ मधुमेह असलेल्या महिलांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि यामुळे औषधांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते. 

६. दीर्घकाळ स्तनपान केल्यामुळे स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

२. आईच्या दुधाचे बाळाला फायदे...

१. नवजात बाळाच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी सुरुवातीच्या काळात नियंत्रित राहते, जे पुढे जाऊन चयापचय क्रिया स्थिर ठेवण्यास मदत करते. 

२. स्तनपानामुळे बाळाला पुढे जाऊन टाइप २ मधुमेह किंवा लठ्ठपणा होण्याची शक्यता कमी होते.

३. आईच्या दुधात असणाऱ्या अँटीबॉडीज आणि संरक्षणात्मक घटकांमुळे बाळाची इम्युनिटी बळकट होते, आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

४. बाळांना सर्दी, खोकला, जठराचे विकार आणि इतर संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

५. आईच्या दुधातील पौष्टिक घटक बाळाच्या मेंदूचा विकास, हाडे मजबूत होणे आणि संपूर्ण शरीराच्या निरोगी वाढीस मदत करतात.

६. स्तनपानामुळे बाळाची चयापचय प्रक्रिया नीट कार्य करते, जे बाळाच्या आरोग्यास फायदेशीर असते. 

मधुमेही मातांनीही स्तनपान करणे सुरक्षितच नाही, तर बाळाच्या व स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीरही ठरते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य पद्धतीने स्तनपान सुरू ठेवावे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सजागतिक स्तनपानमधुमेहप्रेग्नंसीगर्भवती महिला