कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलीवूडमधलं एक सुपरहीट जोडपं. त्यांच्या आयुष्याला आता एक सुखद कलाटणी मिळणार असून ते दोघेही लवकरच आई- बाबा होणार आहेत. एक अतिशय छान फोटो शेअर करून कतरिनाने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. करिअरमुळे पाळणा लांबविला जातो हे आता खूप कॉमन झालं आहे. त्यामुळेच तर वाढत्या वयासोबतच गरोदरपणातल्या, बाळंतपणातल्या अडचणीही वाढत आहेत, असं तज्ज्ञ सांगतात. कतरिना सध्या ४२ वर्षांची आहे. नेहा धुपिया, शिल्पा शेट्टी, प्रिटी झिंटा यांच्या प्रमाणेच ती ही उशिरा आई होत आहेत. चाळिशीनंतरचं गरोदरपण आणि बाळंतपण खरंच अवघड असतं का?(Pregnant at 40 - Benefits, Risks and What to Expect)
चाळिशीनंतरचं बाळंतपण
नाशिक येथील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर म्हणतात की लेट प्रेगनन्सी प्रश्नाला दोन- तीन बाजू आहेत. वैद्यकीय दृष्टीने विचार केल्यास पहिले आम्ही सांगतो की तिशीच्या आत पहिलं बाळांतपण व्हायला हवं. ते उत्तम आहे. उत्तम यासाठी की तिशीच्या आत गरोदर झाल्यास स्त्री बीजाची गुणवत्ता उत्तम असते. वयाच्या तिशीनंतर पस्तिशीत वगैरे अंडाशयात तयार होणाऱ्या स्त्री बीजाची गुणवत्ता कमी होत जाते.
शांत, गाढ झोप लागतच नाही- सारखी जाग येते? ५ गोष्टी करा, मस्त झोप होऊन फ्रेश व्हाल
स्रीबीजाची गुणवत्ता कमी होण्याचा आलेख वयाच्या पस्तीशीनंतर अधिकच खाली उतरत जातो. पण म्हणून तिशी पस्तीशीनंतरच्या प्रत्येकच गरोदरपणात धोका असतो असं नाही. मात्र स्त्री बीज ॲबनॉर्मल असण्याची शक्यता वाढत जाते. आणखी एक बाब म्हणजे स्त्रीचं वय जर ४० असेल तर अर्थात जोडीदाराचं वय आणखी जास्त असेल किंवा तेवढंच असेल अशा परिस्थितीत पुरुषाच्या बीजाचाही तेवढाच परिणाम गर्भावर होतो. यातून जो गर्भ तयार होतो त्यात जनुकीय दोष येण्याची शक्यता वाढते. वय वाढलं की ही शक्यता वाढत जाते. पण म्हणून हा धोका सगळ्यांनाच असतो असं नाही .
याशिवाय अजून काही गोष्टींचा विचार करायला हवा
१. लेट प्रेगनन्सीमधे आईच्या तब्येतीचा विचारही महत्त्वाचा असतो. पस्तिशीच्या पुढे, चाळीशीनंतर आईच्या आरोग्यविषयक समस्या वाढत जातात. स्त्रियांमधे मधुमेह, रक्तदाब असे आजार निर्माण व्हायला लागतात. तसेच ताणाशी निगडित समस्या वाढत जातात.
आंबट ताकासोबतच कडिपत्त्याला घाला २ पदार्थ, भराभर वाढून हिरवागार होईल, येतील सुगंधी मोठी पाने
तिशीच्या आत आणि तिशीनंतर स्त्रियांच्या आरोग्याचा तुलनात्मक विचार केल्यास त्यात मोठा फरक दिसतो. हाडांची कॅल्शियम शोषून घेण्याची जी क्षमता असते याला ‘कॅल्शियम मेटॉबॉलिझम’ म्हणतात तो ३०- ३५ वयानंतर उत्तम असतो. पण त्यानंतर स्त्रीच्या शरीरातील कॅल्शियमचं गणित बदलायला लागतं. अशा परिस्थितीत योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचा गर्भावरही परिणाम होतो.
आरशात पाहिलं की डोक्यावरचे पांढरे केसच जास्त दिसतात? ३ उपाय, केस होतील काळेभोर
२. प्रत्यक्ष गरोदरपणात होणाऱ्या गुंतागुती हाही महत्त्वाचा विषय आहे. गरोदरपणात होणारा मधुमेह ज्याला ‘जस्टेशनल डायबिटीज’ म्हटलं जातं, गरोदरपणात वाढणारा रक्तदाब किंवा बाळाची योग्य पध्दतीनं वाढ न होणं, अपुऱ्या दिवसात प्रसूती होण्याचा धोका असतो. यात नैसर्गिकरित्या गरोदर राहाणाऱ्या स्त्रिया आणि आयव्हीएफद्वारे राहाणारं गरोदरपण यातही असं दिसून येतं की कृत्रिमरित्या गरोदरपणात मधुमेह, रक्तदाब, लवकर प्रसूती होणं किंवा बाळाची मर्यादित वाढ होणं या सगळ्या समस्यांची शक्यता थोडी जास्त असते. त्यामुळे वय हा घटक गरोदरपणात महत्त्वाचा होतो. वैद्यकीयदृष्ट्या पहिलं बाळ तिशीच्या आत आणि दुसरं बाळही तिशीच्या आत किंवा पस्तीशीच्या आत होणं सुरक्षित असतं. पण याचा अर्थ असा नाही की पस्तीशीनंतर किंवा चाळीशीत गरोदर राहूच नये. अनेकदा तसा निर्णय जोडपी किंवा स्त्रिया घेतात, त्या गरोदरपणात जास्त काळजी घ्यायला हवी, हे महत्त्वाचे.