Join us   

या ७ कारणांमुळे नेहमी चुकीची येते प्रेग्नेंसी टेस्ट; अचूक परिणामांसाठी डॉक्टर सांगतात की.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 4:22 PM

faulty pregnancy : गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात, ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन या हॉर्मोनची पातळी खूप कमी असते. यामुळे, आपण प्रेग्नेंसी टेस्टमध्ये घाई केल्यास, निकाल चुकीचा येऊ शकतो.

प्रेग्नेंट असतानाही महिलांची टेस्ट  निगेटिव्ह येते. अनेक महिलांना असा अनुभव येतो. टेस्ट चुकीची आल्यानं उपचारही चुकीच्या दिशेनं होऊ शकता. तुमच्याही मनात प्रेग्नेंसी टेस्टबाबत काही प्रश्न असतील तर आज त्याची योग्य उत्तरं नक्कीच मिळतील. मदरहुड रुग्णालयातील डॉक्टर मनीष  (faulty pregnancy test)  यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

प्रेग्नेंसी टेस्ट करताना घाई करणं

घरात प्रेग्नेंसी किट आणून घाई घाईत प्रग्नेंसी टेस्ट केल्यानं परिणाम चुकीचे येऊ शकतात.  योग्य परिणाम दिसण्यासाठी काहीवेळ वाट पाहणं उत्तम ठरतं. प्रेग्नेंसी किटवर मुत्राचे काही थेंब टाकल्यानंतर लाईन पॉईंट्सवर प्रेग्नेंट आहात की नाही ते कळतं. अशा स्थितीत तुम्ही मुत्राचे थेंब किटवर टाकल्यानंतर काहीवेळ वाट पाहायला हवी. जेव्हाही तुम्ही बाहेरून किट आणत असाल तेव्हा कमीत कमी १० मिनिटं वाट पाहा जेणेकरून योग्य परिणाम दिसून येईल. 

वेळेआधी प्रेग्नेंसी टेस्ट करणं

आपण वेळेपूर्वी चाचणी केल्यास आपली प्रेग्नेंसी टेस्ट नकारात्मक असू शकतो. खरं तर, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात, ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन या हॉर्मोनची पातळी खूप कमी असते. यामुळे, आपण प्रेग्नेंसी टेस्टमध्ये घाई केल्यास, निकाल चुकीचा येऊ शकतो.

किटची एक्पायरी डेट तपासून घ्या

प्रेग्नन्सी किट खरेदी करण्यापूर्वी एक्सपायरी डेटची खात्री करुन घ्या. जर आपल्या किटमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेली असेल तर चुकीचे परिणाम दिसून शकतात.

प्रेग्नेंसी किटवरील  माहिती व्यवस्थित लक्षात घ्या

कधीकधी प्रेग्नेंसी किटवरील  दिलेल्या निकालांचा परिणाम चुकीचा देखील असू शकतो. आपण पट्ट्यावर लघवी योग्य प्रकारे न घातल्यास, परिणाम चुकीचे येऊ शकतात. तसेच, जर पट्ट्या मूत्राबरोबर पाण्यात मिसळल्या असतील तर अचूक परिणाम मिळण्यास समस्या येऊ शकते. खूप लवकर चाचणी केल्यामुळे किंवा चाचणीचा उशीरा निकाला दिसल्यामुळे प्रेग्नेंसी टेस्ट चुकीची येऊ शकते.

मुत्र पातळ होणं

मूत्रातील अशुद्धतेमुळे, आपल्या प्रेग्नेंसीचे परिणाम देखील चुकीचे असू शकतात. सकाळी उठल्यानंतर ताबडतोब आपली प्रेग्नेंसी टेस्ट करा. यावेळात निकाल योग्य असण्याची शक्यता जास्त असते. सकाळी मूत्रात उच्च प्रमाणात एचसीजी (ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन) असते, जे अचूक परिणाम देऊ शकतात.

औषधांचा वापर

काही औषधांच्या अतिवापरामुळे प्रेग्नेंसी टेस्ट चुकीची येऊ शकते. उदाहरणार्थ एलर्जीचे औषध, फिट्स न येण्याची औषधं अशा प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यास प्रेग्नेंसी टेस्ट चुकीची येऊ शकते. 

टेस्ट किट अतिसंवेदनशील असणं

प्रेग्नेंसी किटच्या संवेदनशीलतेवर अवलंबून, परिणाम देखील येऊ शकतात. वास्तविक, काही गर्भधारणेचे उपकरणं जास्त संवेदनशील असतात. काही किटमध्ये, रक्तामध्ये यूरिन किंवा एचसीजीची फारच कमी मात्रा असते तरीही त्याचे परिणाम अचूक आढळतात. त्याच वेळी, काही किट्स असे आहेत ज्यात संवेदनशीलता कमी आहे. अशावेळी चुकीचा परिणाम दिसू शकतो. 

प्रेग्नेंसी टेस्ट चुकीची आल्यावर काय करायला हवं?

पुन्हा चाचणी करा किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा, डॉक्टरांच्या सल्ल्यानं अल्ट्रासाऊंड तुम्ही करू शकता, मासिक पाळीचे चक्र व्यवस्थित करण्यासाठी चांगला आहार घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.  

टॅग्स : हेल्थ टिप्समहिलाप्रेग्नंसीगर्भवती महिलाआरोग्य