आपल्यापैकी अनेकांना रात्रीची शांत व गाढ झोप न येण्याची समस्या सतावते. खरंतरं, झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. कामाचा ताण, डोक्यावरील वाढलेला स्ट्रेस किंवा चुकीची लाईफस्टाईल पद्धती, व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांसारख्या अनेक कारणांमुळे झोप लागत नाही. रात्रीची अपुरी झोप आरोग्यासाठी हानिकारक असते. पुरेसे तास (nutmeg milk for better sleep at night) आपली झोप लागली नाही तर अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. झोप न लागणे किंवा वारंवार जाग येणे यामुळे शरीर थकलेले आणि त्याचा मनावर देखील ताण येतोच. वारंवार (jaiphal to get deep sleep) झोप न येण्याच्या या वाईट सवयीमुळे आपल्या झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेचे चक्र बिघडते सोबतच झोपेची गुणवत्ता देखील खराब होते. रात्री शांत व गाढ झोप येण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो(home remedy to cure sleeplessness with nutmeg).
आपल्याला नैसर्गिक पद्धतीने शांत व गाढ झोप येण्यासाठी, नैसर्गिक आणि घरगुती उपाय बरेचसे फायदेशीर ठरतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शांत व गाढ झोप येण्यासाठी एक खास घरगुती उपाय शेअर केला आहे. दुधात चिमूटभर घरातील या मसाल्याची पूड मिसळल्यास लगेच शांत व गाढ झोप येते.
जायफळ का आहे खास ?
जर झोप न येण्याची समस्या सतावत असेल तर यासाठी, सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर जैदी यांनी झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर जायफळाची पूड मिसळून पिण्याचा खास उपाय सांगितला आहे.आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगतात की, आयुर्वेदामध्ये जायफळ (Nutmeg) एक नैसर्गिक पद्धतीने झोप आणणारे औषध मानले जाते. यात मायरोस्टिसिन (Myristicin) नावाचे एक कंपाऊंड असते, जे मेंदूला शांत करते आणि सेरोटोनिन (Serotonin) हार्मोनला सक्रिय करते. सेरोटोनिनपासून मेलाटोनिन (Melatonin) तयार होते, जे झोप आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
ना फॅन्सी डाएट, ना महागडे सप्लिमेंट्स ! ऋजुता दिवेकर सांगते, घरचे साधे जेवण जेवून होतो वेटलॉस...
संशोधनात झाले सिद्ध...
डॉक्टर जैदी पुढे सांगतात की, एका छोट्या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, दररोज रात्री २ ग्रॅम जायफळ खाल्ल्याने १५ दिवसांमध्ये लोकांच्या झोपेचा वेळ ३.५ तासांवरून वाढून जवळपास ७ तास झाला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, यामुळे केवळ झोपेची गुणवत्ताच चांगली टिकून राहिली नाही, तर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम देखील झाले नाहीत.
झोपेसाठी जायफळ कसे खावे?
१. डॉक्टर जैदी यांच्या मते, झोपण्यापूर्वी साधारणपणे ३० मिनिटे आधी एका ग्लासमध्ये गरम दूध घ्या.
२. त्यात एक चिमूटभर (१/४ चमचा किंवा त्यापेक्षा कमी) जायफळ पावडर टाका.
३. हवे असल्यास, चवीसाठी थोडेसे गूळ देखील आपण घालू शकता.
४. हे दूध शांतपणे बसून हळूहळू प्या आणि नंतर मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.
५. खोलीतील लाईट बंद करून आरामात झोपी जा. यामुळे मेंदू शांत होईल आणि गाढ झोप लागेल.
या गोष्टी लक्षात ठेवा...
झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी जायफळ पूड फायदेशीर असली तरी डॉक्टर जायफळ जास्त प्रमाणात न घेण्याचा सल्ला देतात. जास्त प्रमाणात जायफळ घेतल्यास चक्कर येणे, अस्वस्थता आणि उलटी होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्यांना लिव्हर किंवा किडनीचा आजार आहे, त्यांनी हे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टर जैदी यांच्या मते, जायफळ पूड घातलेले दूध तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवू शकते आणि यामुळे तुम्हाला सकाळी ताजेतवाने वाटते. हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे, परंतु दुधातून जायफळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेणे आवश्यक असते.