काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती होती की मुली आठवी, नववीमध्ये गेल्या की मग त्यांना मासिक पाळी सुरू व्हायची. काही जणींना तर दहावीची परीक्षा झाल्यानंतरही पाळी सुरू व्हायची. पण मागच्या काही वर्षांपासून मुलींना पाळी येण्याचं वय कमी कमी होत असल्याचं दिसून येत आहे. आता तर अशी परिस्थिती आली आहे की अवघ्या ८- ९ वर्षांच्या मुलींनाही पाळी येत आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला लेकी आहेत, त्या सगळ्याच आईंची मानसिक अवस्था थोडी नाजुक होत जाते. कारण पाळी आली की मुलींचं बालपण कुठेतरी हरवून गेल्यासारखं होतं. म्हणूनच मुलींचं पाळी होण्याचं वय अलीकडे का येत आहे आणि तसं होऊ नये म्हणून काय उपाय करावा, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती वाचायलाच हवी...(Why Do Girls Getting Periods At a Younger Age?)
कमी वयातच मुलींना पाळी का येते आहे?
मुलींना कमी वयातच पाळी का येत आहे, याविषयी डॉ. पवन मंडाविया यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की हल्ली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणा म्हणजेच शरीरात एडिपोज टिश्यू वाढणे.
शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल
हे टिश्यू वाढल्यामुळे कमी वयातच असे हार्मोन्स स्त्रवू लागतात जे कमी वयातच पाळी येण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे मुलींच्या खाण्यापिण्याकडे खूप आधीपासूनच व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. फॅटयुक्त पदार्थ टाळणं हा त्यावरचा एक चांगला उपाय ठरू शकतो.
याशिवाय डॉक्टर असंही सांगतात की मुलींची स्लीप सायकल खूप विस्कळीत झालेली आहे. अगदी कमी वयातल्या मुलीही रात्री मोबाईल पाहणे किंवा टीव्ही पाहणे असे नेहमीच करतात.
गुलाबाचं रोप नुसतंच वाढतं- फुलांचा पत्ताच नाही? ४ पदार्थ मातीत मिसळा- रोपांना येतील फुलंच फुलं
यामुळे मग रात्रीची जागरणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा सुरू होणारी दिनचर्या.. हे जर सतत होत राहिले तर याचा वाईट परिणाम मुलींच्या हार्मोन्सवर होतो. हार्मोन्सचे असंतुलन होते. त्यामुळेही कमी वयातच पाळी सुरू होण्याचा धोका वाढत जातो. हल्ली मुलींना अभ्यासाचा ताणही खूप असतो. वाढलेल्या स्ट्रेसचाही वाईट परिणाम शरीरावर होत जातो.