What is Premenstrual Syndrome: आपण पाहिलं असेल की, मासिक पाळी येण्याच्या काही दिवसआधी आपला मूड अचानक बदलतो. थकवा तर जाणवतोच, सोबतच छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडही वाढते. या दिवसांमध्ये आपलं शरीर आणि मेंदू हार्मोनल सिग्नल पाठवत असतो. ज्याला प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम किंवा PMS म्हटलं जातं.
PMS मुळे फक्त शरीरात बदल होतो असं नाही तर मानसिक स्थिती आणि भावनांवरही प्रभाव पडतो. कधी कधी याची तीव्रता हलकी असते, कधी कधी तीव्रता जास्त असते, ज्यामुळे रोजच्या कामांमध्ये अडथळा होतो. महत्वाची बाब म्हणजे योग्य माहिती, व्यायाम आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून याला कंट्रोल करता येतं. अशात PMS ची लक्षणं, याची कारणे आणि सोपे उपाय आपण आज पाहणार आहोत.
PMS ची लक्षणं
पीएमएस दरम्यान महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल जाणवतात. पोटात सूज, गॅस, बद्धकोष्ठता आणि स्तनांमध्ये वेदना ही सामान्य लक्षणं दिसतात. तसेच डोकेदुखी, थकवा आणि झोपेत बदलही प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोमचा भाग आहेत. यादरम्यान महिलांच्या भूकेतही बदल दिसतो. तसेच बऱ्याच महिलांना पिंपल्स आणि केसगळतीची समस्या होते.
PMS कमी करण्याचे उपाय
संतुलित आहार घेल्याने आणि भरपूर पाणी प्यायल्याने PMS नियंत्रित करण्यास मदत मिळते ताजी फळं, भाज्या, कडधान्य आणि प्रोटीनचा आहारात समावेश करावा.
नियमितपणे व्यायाम, योगा आणि स्ट्रेचिंगने हार्मोनमध्ये संतुलन ठेवण्यास मदत मिळते.
स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान, मोठा श्वास घेण्याचा व्यायाम किंवा आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्या.
काय सांगतात डॉक्टर?
जर PMS ची लक्षणं गंभीर असेल किंवा रोजचं रूटीन यामुळे बिघडत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट घेऊ शकता. योग्य दिनचर्या, हेल्दी आहार आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवून महिला PMS चा प्रभाव बराच कमी करू शकतात. या गोष्टींच्या मदतीने आपल्याला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आराम आणि ऊर्जा मिळते. फक्त औषधं कुणाच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
Web Summary : PMS causes mood swings, fatigue, and irritability before menstruation. Manage symptoms with balanced diet, exercise, and stress reduction. Consult doctor for severe cases.
Web Summary : पीएमएस मासिक धर्म से पहले मूड में बदलाव, थकान और चिड़चिड़ापन का कारण बनता है। संतुलित आहार, व्यायाम और तनाव कम करके लक्षणों का प्रबंधन करें। गंभीर मामलों में डॉक्टर से सलाह लें।