योनीमार्गातून होणारा स्त्राव ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि फारच कॉमन गोष्ट आहे. हा स्त्राव योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यास आणि संसर्गापासून वाचवण्यासाठी मदत करतो. व्हजायनल डिस्चार्ज शरीरातील घाण, बॅक्टेरिया आणि मृत पेशी बाहेर टाकण्याचे काम करतो. परंतु, या डिस्चार्जचा रंग, प्रमाण किंवा वास बदलल्यास ते केवळ सामान्य नाही तर आरोग्याच्या वेगवेगळ्या स्थितीचे संकेतही देतात(vaginal discharge color meaning).
अनेक स्त्रिया या स्त्रावाच्या रंगाकडे किंवा स्वरूपाकडे दुर्लक्ष करतात, जे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दलचे महत्त्वाचे संकेत देतात. या स्त्रावाचा रंग, वास आणि त्याची घनता बदलल्यास ते तुमच्या शरीरात काहीतरी बदल होत असल्याचे जसे की, संसर्ग, हार्मोनल बदल किंवा इतर गंभीर स्थिती असल्याचे दर्शवते. साधारणपणे हा व्हजायनल डिस्चार्ज पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाचा (what discharge says about your health) असतो आणि त्याचे प्रमाण मासिक पाळी, वय, गर्भधारणा, आणि लैंगिक क्रियेनुसार बदलू शकते. पांढरा, पिवळा, हिरवा, तपकिरी किंवा गुलाबी अशा प्रत्येक डिस्चार्जच्या रंगामागे आरोग्याच्या वेगवेगळ्या (vaginal discharge health signs) स्थिती असतात.
व्हजायनल डिस्चार्जचा रंग नेमक काय सांगतो ?
१. सफेद आणि जाडसर स्त्राव :- योनीमार्गातून पडणारा डिस्चार्ज जर थोडा जास्त चिकट आणि वास नसलेला असेल, तर तो नॉर्मल असतो. पण जर तो दह्यासारखा दिसणारा आणि योनी मार्गात खाज येणारा आणि उग्र वास असलेला असेल, तर तो गंभीर बुरशीजन्य संसर्गाचा इशारा असू शकतो.
२. पिवळा आणि हिरवा स्त्राव :- हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा स्त्राव जीवाणूजन्य लैंगिक संसर्गाचा संकेत असू शकतो. तसेच, यीस्टचा संसर्ग झाला असतानाही असा स्त्राव होऊ शकतो. हा स्त्राव सहसा जाड, पू-सारखा किंवा फेसयुक्त असतो, ज्यात माशासारखा वास किंवा योनीमार्गत हलकी जळजळ देखील होऊ शकते.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
३. तपकिरी किंवा रक्तमिश्रित स्त्राव :- तपकिरी किंवा रक्तमिश्रित स्त्राव अशा प्रकारचा स्त्राव मासिक पाळी संपल्यानंतर पडणे नॉर्मल असू शकतो, परंतु जर तो अनियमित असेल, तर तो गर्भाशय किंवा सर्व्हिक्सच्या समस्येचा संकेत असू शकतो.
४. पाण्यासारखा पारदर्शक स्त्राव :- हा स्त्राव ओव्हुलेशनच्या दरम्यान किंवा गर्भधारणेत होण सामान्य मानले जाते आणि तो निरोगी योनीमार्ग राखण्यासाठी मदत करतो.
५. राखाडी किंवा फेसयुक्त स्त्राव :- हा स्त्राव ट्रायकोमोनियासिस नावाच्या संसर्गाचा संकेत असू शकतो. हा संसर्ग लैंगिक संबंधांदरम्यान पसरतो. महिलांमध्ये यामुळे योनीमार्गात खाज आणि लघवी करताना जळजळ यांसारख्या समस्या देखील जाणवू शकतात.
डायबिटीस असेल तर गव्हाच्या नको 'या' पिठाच्या चपात्या खा! शुगर वाढण्याचं टेंशनच विसरा, जेवा पोटभर...
६. प्रत्येक रंग काय सांगतो ?
प्रत्येक रंगाच्या स्त्रावानुसार, आरोग्याच्या समस्या देखील वेगवेगळ्या असू शकतात. पण, जर स्त्राव असामान्य असेल, म्हणजे तो जाड, वास असलेला, जळजळ खाज आणि वेदनादायक असेल, किंवा स्त्रावाचा रंग किंवा प्रमाण खूप जास्त असेल किंवा लैंगिक संबंधानंतर हा स्त्राव मोठ्या प्रमाणात पडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण हा स्त्राव असामान्य असून, योनीमार्गाच्या आरोग्यामध्ये काहीतरी असामान्य असल्याचे संकेत देतात.
