Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कधी कधी महिलांना एकाच महिन्यात दोनदा येते मासिक पाळी? असं का होतं, पाहा कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:04 IST

Irregular Menstruation : जर असं पुन्हा पुन्हा होत असेल तर वेळीच याबाबत डॉक्टरांना सांगा. कारण ही स्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते. अशात असं का होतं किंवा याची कारणे काय ती माहीत असणं गरजेचं ठरतं. 

Irregular Menstruation : दर महिन्याला मासिक पाळी येणं ही सामान्य बाब आहे. एकदा आलेली पाळीच तर असह्य त्रास देऊन जाते. अशात जर एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येणं हा मोठा चिंतेचा विषय ठरतो. जर असं पुन्हा पुन्हा होत असेल तर वेळीच याबाबत डॉक्टरांना सांगा. कारण ही स्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते. अशात असं का होतं किंवा याची कारणे काय ती माहीत असणं गरजेचं ठरतं. 

चक्र समजून घ्या

सामान्यपणे मासिक पाळीचं चक्र हे २८ दिवसांचं असतं. पण जर २१ ते ३५ दिवसांचं असेल तरी ते सामान्य मानलं जातं. पण जर का आपलं मासिक पाळीचं चक्र २१ दिवसांपेक्षा लहान असेल किंवा ३६ दिवसांपेक्षा मोठं असेल, किंवा दर महिन्यात तारखांमध्ये मोठं अंतर राहत असेल तर याला अनियमित मानलं जातं. सोबतच तणाव किंवा लाइफस्टाईलमध्ये बदल झाल्यामुळे कधी-कधी पाळीची तारीख मागे-पुढे होणं फारच कॉमन आहे. पण जर असं पुन्हा पुन्हा होत असेल हे शरीरासाठी गंभीर ठरू शकतं.

महिन्यातून दोनदा पाळी येण्याची कारणे

हार्मोन असंतुलन - हार्मोनचं संतुलन बिघडणं हे एका महिन्यात दोनदा पाळी येण्याचं एक मुख्य कारण आहे. अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन आपल्या मासिक पाळीचं चक्र चालवण्यास मदत करतात. तेच जेव्हा या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, तेव्हा पाळी अनियमित होते आणि महिन्यातून दोनदा येऊ शकते. फार जास्त तणाव किंवा लाइफस्टाईलमध्ये बरेच बदल केले तर हार्मोनचं संतुलन बिघडतं.

PCOS - PCOS हार्मोनसंबंधी एक कॉमन समस्या आहे, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि महिन्यातून दोनदाही येऊ शकते. यात महिलांच्या ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या गाठी तयार होतात, ज्या मासिक पाळीची वेळ बिघडवतात.

गर्भाशय फायब्रॉएड - Uterine Fibroids गर्भाशयामध्ये होणाऱ्या छोट्या गाठी असतात, या गाठी कुठे आणि किती मोठ्या आहेत यावर मासिक पाळीत जास्त ब्लीडिंग किंवा अनियमितता होऊ शकते. कधी कधी यामुळे महिन्यातून दोनदा पाळी येऊ शकते. 

थायरॉइड - थायरॉइडची समस्या जसे की, हायपरथायरायडिज्म किंवा हायपोथायरायडिज्ममुळे आपल्या मासिक पाळीचं चक्र बिघडतं. हे आजार थायरॉइड ग्रंथीमधून निघणाऱ्या हार्मोनला प्रभावित करतात. ज्यामुळे पाळीच्या वेळेत, ब्लीडिंग कमी जास्त होणे किंवा जास्त होणे यात बदल होऊ लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Irregular periods twice a month: Know the common causes.

Web Summary : Experiencing two periods in one month can be concerning. Hormonal imbalances, PCOS, uterine fibroids, and thyroid issues are potential causes. Consult a doctor if this occurs frequently, as it could indicate a serious underlying health condition.
टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यस्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्स