Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा..... 

सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा..... 

Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक म्हणजेच सारा तेंडुलकर. ती सांगतेय मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात तिला झालेल्या PCOS या त्रासाविषयी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 19:11 IST2025-05-10T19:09:53+5:302025-05-10T19:11:01+5:30

Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक म्हणजेच सारा तेंडुलकर. ती सांगतेय मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात तिला झालेल्या PCOS या त्रासाविषयी..

Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS, sara tendulkar sufferes from Polycystic ovary syndrome | सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा..... 

सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा..... 

Highlightsपीसीओएस आहे म्हणजे आपल्याला खूप काही वेगळे झाले आहे, असे समजून घाबरून जाऊ नका. साराप्रमाणेच तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडू शकता..

सारा तेंडुलकरची ओळख आता नव्याने द्यायला नको.. ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे.. पण तिचे स्वत:चेही जबरदस्त फॅन फॉलोईंग तिने तयार केलेले आहे. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते असून काही ना काही कारणाने सारा नेहमीच चर्चेतही असते. आता Vogue India ने तिची नुकतीच मुलाखत घेतली असून गप्पांच्या ओघात साराने तिला मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या Polycystic ovary syndrome (PCOS) या त्रासाविषयी माहिती दिली. तसेच हा त्रास कमी करण्यासाठी तिच्या आईने काय काय प्रयत्न केले हे देखील तिने सांगितले. हल्ली पीसीओएस समस्या खूप वाढली आहे. त्यामुळेच साराने जे काही उपाय केले ते जाणून घेणे हा त्रास असणाऱ्या प्रत्येकीलाच नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.(Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS)

 

सारा तेंडुलकर म्हणजे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची...

मुलाखती दरम्यान सारा सांगते की ती जेव्हा सातवी- आठवीत होती, तेव्हा तिला हा त्रास सुरू झाला. पीसीओएसच्या त्रासामुळे शरीरात खूप बदल होत जातात. जसे की चेहऱ्यावर अतिरिक्त केस येणे, त्वचा खूप तेलकट होणे, त्वचेवर पिंपल्स- ॲक्ने येणे, वजन वाढणे... असे कित्येक त्रास होत असतात.

एक्सपर्ट सांगतात- महिलांनो फक्त ३ गोष्टी करा, महिनाभरात वजन उतरून 'फॅट'च्या 'फिट' व्हाल..

असेच त्रास सारालाही झाले. त्यामुळे मग घराबाहेर पडायला नकोसे वाटायचे. सगळ्यांमध्ये जाण्याची लाज वाटायची. कारण प्रत्येकजण माझ्याकडेच बघतो आहे, असं वाटून उगाच अवघडल्यासारखं व्हायचं. पिंपल्स, ॲक्ने, तेलकट त्वचा असे सगळे त्रास कमी करण्यासाठी तिने ॲसिड पिल्स, ॲण्टीबायोटिक्स आणि इतर अनेक उपचारही घेतले पण विशेष फरक पडला नाही. शेवटी या सगळ्यातून बाहेर पडायला तिच्या आईने तिला मदत केली. 


 

PCOS चा त्रास कमी करण्यासाठी साराने काय केले?

साराची आई म्हणजेच अंजली तेंडुलकर तिला एका आहारतज्ज्ञांकडे घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिला इंटरमिटंट फास्टिंगचा पर्याय दिला. यामुळे वाढत्या वजनावर आपोआपच नियंत्रण आले. त्यानंतर त्यांनी तिच्या आहारातले प्रोटीन्स वाढवले.

नाश्त्याला करा विदर्भ स्पेशल उकडपेंडी! खमंग पौष्टिक पदार्थ, चवीला झकास पोटाला दमदार...

याशिवाय शरीरातले हार्मोन्सचे संतुलन योग्य राहण्यासाठीही विशेष डाएट प्लान दिले. नियमितपणे हे सगळे नियम पाळल्यामुळे साराचा PCOS चा त्रास कमी झाला. हल्ली खूप जणींना हा त्रास होतो. पीसीओएस आहे म्हणजे आपल्याला खूप काही वेगळे झाले आहे, असे समजून घाबरून जाऊ नका. साराप्रमाणेच तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडू शकता..
 

Web Title: Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS, sara tendulkar sufferes from Polycystic ovary syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.